काश्मीरमधील चकमकीत साक्रीचा जवान शहीद

0
 धुळे / नंदुरबार :  दहशतवाद्यांशी लढतांना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे राहणाऱ्या मिलिंद किशोर खैरनार हा जवान शहीद झाला.
तो मुळचा नंदुरबार जिल्हयातील आहे मात्र,  त्याचे वडील किशोर खैरनार हे साक्री येथे वीज महामंडळात नोकरीला होते. त्यामुळे किशोर हा आपल्या जन्मापासून साक्रीत राहिला असून इथूनच तो देश सेवेसाठी सैन्यात दाखल झाला.
त्याच्या वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर त्याचा परिवार सध्या नाशिक येथे राहत असून त्याचा मोठा भाऊ हा मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. त्याच्या मृत्यूने आज संपूर्ण साक्री शहरासह धुळे जिल्हयात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
 मिलिंद चे वडिल साक्री येथे M.S.E.B मधे होते ते चार वर्षा पूर्वी रिटार्यड झाले आहेत . मिलींद हा कश्मिरमध्ये लढतांना शहीद झाला आहे. साक्री येथे त्याचे शिक्षण झाले असून त्यंाचे मुळगाव नंदूरबार जिल्ह्यातील बोराळे हे आहे. त्यंाचे कुटूंबीय नाशिक येथे राहत आहेत. त्याचा एक भाऊ मुंबई पोलिसात आहे. त्याच्या मागे वेदीका नावाची मुलगी, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*