हगणदारीसाठी कापडणे गाव दत्तक घेणार !

0

कापडणे । दि.10 । प्रतिनिधी-कापडणे हे तालुक्यातील सर्वात जास्त हागंदारीमुक्तीचे उद्दीष्ट शिल्लक असणारे गाव आहे. या गावास हागंदारीमुक्तीसाठी सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शासनस्तरावरुन सर्व ती मदत मिळविण्यासाठी प्रयत्न होतील, प्रत्येकाला प्रोत्साहन अनुदान दिले जाईल असे सांगत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरन यांनी कापडणे गाव दत्तक घेण्याचाच प्रयत्न असुन या पार्श्वभूमीवर ही सभा असल्याचेही त्यांनी सांगीतले.

कापडण्यातील हागंदारीमुक्तचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरन यांनी येथे आज (दि.10) येथे विशेष सभेचे आयोजन केले होते.

यावेळी सीईंओंनी हागंदारीमुक्तसाठी विविध उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी यावेळी तक्रारीचा पाढा वाचला. यावर उपाययोजनांचेही आश्वासन देण्यात आले.

येथील श्री.विठ्ठल मंदिराच्या सभागृहात झालेल्या या विशेष सभेस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरन, गटविकास अधिकारी सी.के. माळी, गटशिक्षणाधिकारी पुष्पराज टी. शिंदे,विस्तार अधिकारी कपिल वाघ, सरपंच भटु पाटील, पंचायत समिती सदस्या उषा शरद माळी, उपसरपंच प्रभाकर बोरसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील, ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील, सदस्य भटु पाटील, महेंद्र भामरे,अमोल पाटील, राजेंद्र माळी, प्रमोद पाटील, भैय्या पाटील,भैय्या बोरसे, पितांबर पाटील, मनोज पाटील, सुमित माळी, निवृत्त प्राचार्य विश्वासराव देसले, ग्रामविकास अधिकारी श्री.मोरे, केंद्रप्रमुख एम.के.खैरनार, एच.एस.बोरसे हायस्कुलचे प्राचार्य आर.ए. पाटील, नुतन शाळेचे मुख्याध्यापक संतोष एंडाईत, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पाटील, जिजाबराव माळी, दिपक पाटील, विठोबा माळी तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील शिक्षक वृंद व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

या सभेच्या सुरुवातीलाच गिन्यान पौलाद माळी व इतर महिला ग्रामस्थांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरन यांच्याकडे आमचा संडास बांधून देखील आजपर्यंत निधी मिळाला नाही अशी तक्रार केली. काही ग्रामस्थांनी आपला प्रस्ताव पाठवायला 7 महिने झाल्याचे सांगितले तर काहींनी आपले नावच यादीत नसल्याची तक्रार केली.

यावर बोलतांना सीईंओ डी.गंंगाथरन यांनी सांगीतले की, ग्रामपंचायतीने शौचालयांचे काम चांगल्या दर्जाचे करून घ्यावे. आतापर्यंत येथील 177 कुटुंबाना प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे.

उर्वरीत सर्वांनी शौचालयांची कामे करा, प्रत्येक वंचिताला 12 हजाराचे अनुदान हे दिलेच जाईल. ज्या ग्रामस्थांचे नाव यादीत नसेल त्यांनी रोजगार हमी योजनेतुन प्रस्ताव पाठवावेत. सर्वांना निधीची मदत ही होईलच, यासाठी ग्रा.पं.लाही मदतीचे निर्देश देण्यात आले. तसेच लोकांना घरा घरात जाऊन पाण्याविषयक माहिती द्या असेही सीईओ डी.गंगाथरन यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी गटविकास अधिकारी सी.के.माळी यांनी आपल्या मनोगतात हागंदारीमुक्त साठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. बीडीओ सी.के.माळी व विस्तार अधिकारी कपिल वाघ यांनी शौचालय व हागंदारीमुक्त गांव या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विस्तार अधिकारी कपील वाघ यांनी तर प्रास्तविक जगन्नाथ पाटील यांनी केले. शेवटी आभार सरपंच भटु पाटील यांनी मानलेत.

LEAVE A REPLY

*