‘हस्ती’च्या संतोषकुमारला स्काऊटचा राज्य पुरस्कार

0

दोंडाईचा । दि.10 । वि.प्र.-हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्यु.कॉलेज – दोंडाईचा येथील इ.10वी चा विद्यार्थी संतोषकुमार अशोक जैन याला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते स्काऊट राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सदरचा स्काऊटस्-गाईडस् राज्य पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस्-गाईडस् यांच्यावतीने स्काऊट-गाईड पॅव्हीलियन दादर-मुंबई येथे झाला.

याप्रसंगी भारत स्काऊट -गाईड संघटना नॅशनल चिफ कमिश्नर भा.ई.नगराळे, स्काऊट-गाईड राज्य संस्था मुंबई अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे हे मान्यवर उपस्थित होते.

हस्ती स्कुलचा संतोषकुमार जैन याने शैक्षणिक वर्ष 2015 मध्ये महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स – गाईडस् राज्य कार्यालय मुंबई यांच्यातर्फे राज्य प्रशिक्षण सोनगीर येथे आयोजित स्काऊट राज्य पुरस्कार परिक्षेत घवघवीत यश संपादित केले होते.

यास्तव संतोषकुमार जैन व गांधी अ‍ॅण्ड फुले विद्यालय खेडे येथील विद्यार्थी किरण गायकवाड, यांची प्रातिनीधीक स्वरुपात धुळे जिल्हा स्काऊट-गाईड संघटनेच्यावतीने सदरचा स्काऊट राज्य पुरस्कार स्विकारण्यासाठी निवड झाली होती.

या पुरस्कारासाठी संतोषकुमारला हस्ती स्कूल स्काऊट मास्टर किशोर गुरव, प्रविण गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशास्तव त्याचे स्काऊट-गाईड जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जे.यु.ठाकरे, जिल्हा आयुक्त स्काऊट शेंडे नाना, जिल्हा संघटन आयुक्त संतोष सोनवणे, जिल्हा चिटणीस सुरेश सोनवणे, धुळे जिल्हा मुख्यालय आयुक्त स्काऊट – कैलास जैन आणि स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी व प्राचार्य एस.एन.पाटील यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*