प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी संकल्प अभियान

0

शिरपूर । प्रतिनिधी-आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय, शिरपूर येथे प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान 2017 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना शपथ देण्यात आली.

दिवसेंदिवस दिवस वाढणार्‍या प्रदूषणास आळा घालण्यासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी हे अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमात फटाके पासुन होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व आरोग्यास होणारे नुकसान यावर शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही पाटील मार्गदर्शन केले तसेच पर्यवेक्षक के.आर.जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दिवाळीचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरितसेना विभाग प्रमुख श्री.पी.व्ही.गव्हाळे तसेच आर.आर महाजन, एस.डी.गाडीलोहार, वाय.व्ही.कोठावदे, आर.यु.चौधरी, आर.व्ही.नामगे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

*