जिल्हाधिकार्‍यांनी घेतला सफारी गार्डनचा आढावा : 15 दिवसात अहवाल पाठविणार

0
धुळे / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार सफारी गार्डनचा अंतीम अहवाल तयार करण्याचे काम जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे.
यासाठी आ. अनिल गोटे यांनी सफारी गार्डनसाठी मागितलेल्या 250 एकर जागेची पाहणी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसिलदार सौ.ज्योती देवरे यांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन केली. यात येणारे अडथळे जिल्हाधिकार्‍यांनी समजून घेतले. येत्या 15 दिवसात यासंदर्भात प्रशासनातर्फे अहवाल पाठविण्यात येणार आहे.
येत्या 2-3 दिवसामध्ये उपलब्ध 100 वर्षापासूनचे जुने रेकॉर्ड तपासून सफारी गार्डनचा नियोजीत प्रकल्प कशा पध्दतीने पार पाडायचा. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना दिले.

दरम्यानच्या काळात कब्जेदार असलेल्या काही भूखंडधारकांनी आपली वडिलोपार्जीत इस्टेट समजून धनदांडग्यांना, लक्ष्मीपुत्रांना अव्वाच्या सव्वा किंमतीत विक्री केली आहे. काही धनदांडग्यांनी सदर जमिनीची केलेली बेकायदेशीर, नियमबाहय खरेदी धोक्यात आली आहे.

जमिनी विकणार्‍या व घेणार्‍यांनी तत्कालीन तहसिलदार, प्रांत व महसूल यंत्रणेतील संबंधीत अधिकारी यांना कोट्यावधीची लाच देवून आपले व अथवा आपल्या कुटूंबाचे, मित्रमंडळींचे, नोकरचाकरांचे नांव 7/12 च्या उत्तार्‍यावर लावले आहे. अशा गोष्टींची गांभीर्यांने दखल घेण्यात आली असून अशा पध्दतीने व्यवहार करणार्‍या तत्कालीन अधिकार्‍यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या व्यतिरीक्त शासकीय मालकीची असलेली जमीन मात्र तातडीने सफारी गार्डनच्या उभारणीच्या प्राथमिक कामाकरीता काही अडचणी येणार नाहीत, असे प्राथमिक चर्चेत लक्षात आले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाकडून मान्यता घेवून सफारी गार्डनच्या संरक्षक भिंतीच्या कामाची सुरवात शासनाची अनुमती मिळताच करणे शक्य होणार आहे.

त्यामुळे येत्या वर्ष दोन वर्षात सफारी गार्डनचा आराखडा धुळेकरांना पहायला मिळू शकेल, असा विश्वास आ.गोटे यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*