निमगुळला भाजपाच्या एकता पॅनलचा पराभव : परिवर्तनचा विजय!

0

दोंडाईचा । दि.10 । वि.प्र.-शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ व रामी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष होते. मात्र निमगुळ येथील एकूण तेरा सदस्यांपैकी एक जागा आधीच बिनविरोध झाली.

लागलेल्या निकालात बारा पैकी सहा जागा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाने जिंकल्या तर भाजपाच्या एकता पॅनलला देखील सहा जागा मिळाल्या.

मात्र सरपंच पदासाठी भाजपाला पराभूत करत काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार बापू उरसा भिल विजयी झाले. यामुळे निमगुळ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या निमगुळमध्ये पराभव धक्कादायक मानला जात आहे.

वार्ड क्रमांक 1 मध्ये व 2 मध्ये एकता पॅनलचे राजाराम सिताराम बागल, मिराबाई रंगू भिल हे विजयी झालेत तर सुभद्राबाई हिरामण साळवे हे बिनविरोध झालेत.

वार्ड क्र.2 मध्ये संदीप रोहिदास सैंदाणे, लिलाबाई सोमा सोनवणे व देविदास भिका भिल हे विजयी झालेत. म्हणजेच वार्ड क्र. 1 व 2 मध्ये भाजपाच्या एकता पॅनलचे वर्चस्व कायम राखले.

वार्ड क्रमांक 3, 4 व 5 मध्ये परिवर्तन पॅनलने करिष्मा दाखवत विजय संपादन केला. एवढेच नव्हे तर सरपंच पदाचे उमेदवार बापू उरसा भिल यांनी भाजपाचे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रसिंग पुना भिल यांचाही पराभव केला.

वार्ड क्र.3 मध्ये परिवर्तन पॅनलचे नंदलाल प्रभाकर बागल, लताबाई प्रकाश बागल व एकता पॅनलच्या संगीता वसंत बागल विजयी झाल्या. वार्ड क्र. 4 मध्ये हरी दौलत कुवर व बागल रेखाबाई गुलाब हे चारही परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झालेत.

सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार दोंडाईचाचे माजी नगराध्यक्ष डॉ.रवींद्र देशमुख, जुई देशमुख, माजी सभापती जितेंद्र गिरासे, पंचायत समिती सदस्य मनोहर देवरे, सतिष पाटील, रामीचे माजी सरपंच बापू महाजन यांनी केला शिंदखेडा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राजेंद्र देसले यांनी तालुक्यातील काँग्रेस व आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

*