धुळे तालुक्यात जवाहर गटाचाच झंझावात !

0

धुळे । दि.9 । प्रतिनिधी-तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकित आ.कुणाल पाटील यांच्या नेेतृत्वाखालील काँग्रेसच्या जवाहर गटाचाच झंझावात कायम राहिला असून हवेत असलेल्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांना चांगलीच धोबीपछाड देत पराभवाची धुळ चारली आहे.

एकूण 33 ग्रामपंचायतीच्या निकालानंतर मोराणे प्र.ल., देऊर बु.या ग्रामपंचायतींसह काँग्रेसच्या जवाहर गटाचे 20 ग्रामपंचायतीवर सरपंचपदाचे उमदेवार निवडून आले असून सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्यही जवाहर गटाचेच निवडून आल्याने तेथे जवाहर गटाने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा काँग्रेतर्फे करण्यात आला आहे.

दरम्यान, माघारीनंतर बोरकुंड ग्रामपंचायतीवरही जवाहर गटाच्या सरपंचाची निवड झाली आहे. त्यामुळे आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर गटाचे वर्चस्व तालुक्यावर कायम आहे.

निवडणूक निकालानंतर जवाहर गटाच्या सरपंच व सदस्यांनी आ.कुणाल पाटील यांची भेट घेऊन गुलालांची उधळण,फटक्यांची आतिषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजी करीत विजयी जल्लोष साजारा केला.

तालुक्यात एकूण 33 सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणुक झाली. बहूसंख्य गावांमध्ये माजीमंत्री रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील व आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या जवाहर गटाचे वर्चस्व आहे.

जवाहर गटाने 20 ग्रामपंचातींवर आपली सत्ता स्थापन केली आहे.तसेच मुकटी, न्याहळोद, कौठळ आदी ग्रामंपचातीत जवाहर गटाच्या उमेदवाराला महत्वपूर्ण झुंज देत निसटता पराभव स्विकारावा लागला.

मात्र मुकटी येथे जवाहर गटाचे 12 सदस्य बहूमताने निवडून आले आहेत. त्यामुळे तेथील ग्रामपंचायतीवर जवाहर गटाचेच वर्चस्व राहणार आहे. त्यात देऊर बु., मोराणे प्र.ल., नंदाळे खु. होरपाडा, कुंडाणे,चितोड,सैताळे, बाभुळवाडी,रावेर, चांदे, उभंड, हडसूणे, मांडळ, सिताणे, विश्वनाथ, नावरा, हेंकळवाडी यांच्यासह 20 ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

कार्यकर्त्यांनी व सर्वच ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी आ.कुणाल पाटील यांची भेट घेतली.यावेळी आ.पाटील यांच्यावतीने नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच गुलांलाची उधळण करीत फटाक्यांच्या आतिषबाजीने विजयाचा जल्लोष साजरा केला करण्यात आला. यावेळी आ.कुणाल पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, पं.स.माजी सभापती बाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*