शिंदखेडा तालुक्यात भाजपच अव्वल !

0

दोंडाईचा । प्रतिनिधी-शिंदखेडा तालुक्यात रोहयो व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचा करीष्मा आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालावर देखील दिसून आला असून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निकालामध्येदेखील ना. रावल यांच्या कार्यकर्त्यांनी बाजी मारली आहे.

तालुचक्यातील एकुण 23 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यापैकी 3 ठिकाणी भाजपाचे सरपंच होते तर एका ठिकाणी सर्वपक्षीय पॅनल बिनविरोध करण्यात आले होते.

उर्वरीत 19 गावांची निवडणुक झाली. त्यातदेखील भाजपाने अव्वल राहत कुरूकवाडेमध्ये परिवर्तन घडवून आणले. दोन ठिकाणी भाजपाचे सरपंच निवडून आले नसले तरी मात्र सर्वाधिक सदस्य जिंकून वर्चस्व सिध्द केले.

एकुणच ना. जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला अभेदयच राहीला. तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान झाले. त्यात चिमठाणे, नरडाणा, आरावे, प्रिंपाड, सतारे, वारूड या 6 गावांना भाजपचेच दोन्ही गट एकमेकांविरूध्द लढले.

कुरूकवाडेमध्ये कॉग्रेसचे शामकांत पाटील यांच्या एकतर्फी वर्चस्वाला खिंडार पाडत भाजपाचे प्रकाश पाटील यांनी परीवर्तन घडविले.

निमगुळ येथे भाजपाचे सदस्य सर्वाधिक निवडून आले. पंरतू सरपंचपदाचा उमेदवार शिवसेना, कॉग्रेस, मनसे या सर्वपक्षीय पॅनलचा उमेदवार निवडून दिला.

रामी ग्रामपंचायतीत एकुण 11 जागांपैकी 8 जागा भाजपाच्या, 2 कॉग्रेसच्या तर 1 अपक्ष सदस्य निवडून आला. चिमठाणे ग्रामपंचायतीत भाजपाचे विदयमान जि.प.सदस्य खंडू वंजी भिल यांनी सरपंचपदावर बाजी मारली.

नरडाणा येथे भाजपाच्या नेत्या संजीवनी सिसोदे यांच्या पॅनलचा सरपंचपदाचा उमेदवार विजयी झाला. सतारे येथे गोरखसिंग गिरासे यांनी पुन्हा एकदा आपली सत्ता राखली.

कलमाडीमध्ये बाजार समितीचे संचालक पंकज कदम यांनी देखील सत्ता कायम ठेवली. पाष्टे गावात भाजपाचे मोतीलाल वाकडे यांनीदेखील आपली सत्ता अबाधित राखली.

वारूडमध्ये भाजपाचे प.स.माजी सदस्य दत्तात्रय दोरीक यांनी बाजी मारली. रोहाणे येथे देखील भाजपाच्या प्रविण पाटील यांनी बाजी मारली. विटाई येथे आसाराम पाटील यांनी बाजी मारली. प्रिपांड येथे आनंदा माळी यांनी बाजी मारली.

एकुणच शिंदखेडा तालुक्यात राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला अभेदय राहीला असून ग्रामपंचायतीच्या निकालानंतर भाजपाच अव्वल ठरले आहेत.

 

LEAVE A REPLY

*