बोराडी ग्रामपंचातीवर एकता पॅनलचा झेंडा

0

बोराडी । दि.9 । वार्ताहर-बोराडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत गावासह परिसराचा विकास व गावाची एकता टिकवणारे भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंंधे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तुषार रंंधे यांच्या एकता पॅनलने 17 पैकी 15 जागा व सरपंच पदावर एकतर्फी विजय मिळविला.

तर परिवर्तन पॅनलला फक्त दोन जागा मिळाल्या असून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. ही निवडणूक भाजपा विरोध काँग्रेस अशी होती. या निवडणुकीकडे शिरपूर तालुक्यासह जिल्हातील लोकांचे लक्ष लागून होते.

बोराडी येथील ग्रामपंचायत पंचवाषिक निवडणूकीत एकता पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत होती. एकता पॅनलचे मार्गदर्शक तुषार रंंधे व पॅनल प्रमुख तथा भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंंधे यांनी बोराडी गावात केलेली विकास कामे व गावातील एकता टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल असतात.

म्हणून ही निवडणूक पहिल्या दिवसापासून एकर्फी झाली होती. ह्यात अर्ज छाननीच्या दिवशीच एकता पॅनलची वार्ड नं. तीन मधील सर्वसाधारण स्त्री जागेसाठीचा अर्ज मिराबाई पाटील यांचा बाद झाल्यामुळे एकता पॅनलच्या छायाबाई ज्ञानेश्वर बडगुजर या बिनविरोध झाल्या होत्या. म्हणून 17 पैकी एक जागा बिनविरोध झाल्यामुळे 16 जागासाठी व सरपंच पदासाठी निडणूक झाली.

या निवडणुकीत माजी जि.प.सदस्य रणजितसिंग पवार, मोहन महाजन, गुलाब मालचे, राजेद पाटील आदीनी मिळून परिवर्तन पॅनल उभे केले होते. पण या परिवर्तन पॅनलला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार यांना मिळालेली मते-सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी पावरा सुरेखा सिताराम (विजयी-2676) पवार मयुरी सुरेदसिंग-1364 यांना पराभवाचा सामना करावा लागला असून हया माजी.जि.प.सदस्य व पॅनल प्रमुख रणजितसिंग पवार यांच्या भावजाई आहेत. नोटा-143 मते आहे.

प्रभाग नं. 1 मध्ये अनुसूचित जमाती जागेसाठी भिल सुकदेव खुमान (विजयी-456), भिल मोरु धामण-289, व नोटा-13, अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी भिल मंजूबाई युवराज (विजयी-541), मालचे आशाबाई गुलाब-208 व नोटा-09 ना.मा.प्र.स्त्रीजागेसाठी पाटील भावना सुधाकर (विजयी-529) ,शिराळे सुरेखाबाई प्रभुदास-203. व नोटा-26

प्रभाग नं. 2 मध्ये अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी भिल उज्जनबाई देवसिंग (विजयी-476), भिल कमलाबाई चंदरा-100, व नोटा-03 सर्वसाधारण जागेसाठी पाटील जिजाबराव विनायक (विजयी-429), निकम हेमंत प्रकाश-146. व नोटा-04

प्रभाग नं. 3 मध्ये अनुसूचित जातीसाठी सत्तेसा विजय देविदास (विजयी-611) , सत्तेसा सुभाष नामदेव-167, व नोटा-09, सर्वसाधारण जागेसाठी पाटील संजय मुरलीधर (विजयी-555), पाटील मिराबाई सुभाष-133,पाटील मनोहर दयाराम-88 व नोटा-11

प्रभाग नं.4 मध्ये अनुसूचित जमाती जागेसाठी पावरा भरत गाठया-316 पावर चंदसिंग भरतसिंग (विजयी-420) व नोटा-27 अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी पावरा रिना सुनिल-319 , पावरा कंंचन वसंत (विजयी-409), व नोटा- सर्वसाधारण स्त्री जागेसाठी पावरा प्रमिलाबाई बन्सीलाल (विजयी), पावरा संजनाबाई राकेश व नोटा-35

प्रभाग 5 मध्ये अनुसूचित जमाती जागेसाठी भिल अर्जुन मगन(विजयी-511),पावरा चंदसिंग बन्सी-266 , व नोटा-26 ना.मा.प्र. रंंधे राहुल विश्वासराव (विजयी-507), महाजन निलेश मोहन-280, व नोटा-16 अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी पावरा उमिलाबाई सुनिल (विजयी-579),पावरा ममता काळूसिंग-201 व नोटा-20

प्रभाग नं. 6 मध्ये अनुसूचित जमाती जागेसाठी पावरा डोंंगरसिंंग नासज्या (विजयी-229),पावरा काळूसिंग रामा-171, व नोटा-25 अनुसूचित जमाती स्त्रीजागेसाठी भिल नबाबाई लक्ष्मण (विजयी-263), भिल सिता प्रल्हाद-134 , व नोटा-28 सर्वसाधारण स्त्री जागेसाठी पाटील रेखाबाई नवल (विजयी-268), महाजन शोभा मगन-131, व नोटा-26
प्रभाग नं. चार मधील दोन जागांचा अपवाद वगळता सर्वंंच जागांवर किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा एकता पॅनलचे मार्गदर्शक तुषार रंंधे व यांचे बंधू राहुल रंंधे यांच्या एकता पॅनलने संरपच पदासह 15 जागावर एकतफी विजयी मिळवीला आहे.

LEAVE A REPLY

*