फवारणी करतांना विरदेल येथील शेतकर्‍याचा मृत्यू

0
शिंदखेडा| प्रतिनिधी :  विरदेल ता. शिंदखेडा येथील शेतकर्‍याचा स्वत:च्या शेतातील कापसावर किटकनाशक फवारणी करतांना विषबाधा झाल्याने आज मृत्यू झाला.

याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विरदेल ता. शिंदखेडा येथील आदिवासी टोकरे कोळी कुटुंबातील दशरथ रमेश कोळी हा शेतकरी दि.२५ सप्टेंबर रोजी किटकनाशक औषध स्वत:च्या शेतातील कापसावर फवारणी करत असतांना दुपारी अचानक त्यांना चक्कर यायला लागल्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांना तात्काळ उपचारासाठी धुळे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तेथे आठ दिवस उपचार घेतल्यावर आर्थीक स्थिती नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे उपचार घेतांना आज दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१० वाजता दशरथ रमेश कोळीचा मृत्यू झाला आहे .

दशरथच्या पश्‍चात पत्नी, दोन वर्षाचा मुलगा व एक महीन्याचा मुलगा, एक भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. दशरथच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दशरथ कोळी यांच्या कुंटूंबियाचे सांत्वन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी आ. रामकृष्ण पाटील, विरदेलचे माजी सरपंच बेहेरे यांनी केले.

LEAVE A REPLY

*