सीनबंद येथे दोन गटात हाणामारी

0

धुळे । दि.7 । प्रतिनिधी-साक्री तालुक्यातील सीनबंद येथे ग्रा.पं. निवडणुकीवरुन दोन गटात तुफान मारहाण झाली. या मारहाणीत सर्रास काठ्यांचा वापर करण्यात आला.

मारहाणीत दोन जण जखमी झाले आहेत. तर या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात 21 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ग्रा.पं.निवडणुकीमुळे सीनबंद केंद्रावर रात्री कर्मचारी झोपलेले होते. त्यामुळे जि.प. शाळेत जावू नका असे रमेश गांगुर्डे यांनी राजेंद्र प्रताप पवार यांना सांगितले.

त्याचा राग येवून राजेंद्र प्रताप पवार, कांतीलाल चौरे, सिर्‍या चौरे, सोट्या पवार, संदीप चौरे, निलुभाई पवार, लोटन राऊत, बाबुलाल राऊत, राजू राऊत, दिलीप बागूल यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन गर्दी केली.

तसेच रमेश गांगुर्डे यांना राजेंद्र प्रताप पवार याने काठीने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच इतरांनी शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात रमेश गांगुर्डे हे जखमी झाले.

याबाबत निजामपूर पोलिस ठाण्यात रमेश शामा गांगुर्डे यांनी फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 148, 149, 323, 504, 506 सह मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1), 131 प्रमाणे राजेंद्र प्रताप पवारसह दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत राजेंद्र प्रताप पवार यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, सीनबंद ग्रा.पं.निवडणूकीत वार्ड क्र. 3 मध्ये रमेश शामा गांगुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

त्याबाबत हरकत घेतली असता त्याचा राग येवून साहेबराव तानकू गवळी, मदन गांगुर्डे, चिंतामण गांगुर्डे, शंकर गांगुर्डे, सुदाम गांगुर्डे, शांता गांगुर्डे, चुनिलाल सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, उत्तम सूर्यवंशी, अनिल देवरे, देवीदास गांगुर्डे यांनी गर्दी करुन काठ्यांनी राजेंद्र पवार यांना मारहाण केली.

तसेच त्यांच्या अंगावरील कपडे फाडून ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या तक्रारीवरुन साहेबराव तानकू गवळीसह 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*