शिरसोली येथे डॉक्टरला मारहाण

0

धुळे । दि.7 । प्रतिनिधी-साक्री तालुक्यातील शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याला हाताबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, शिरसोली पैकी बळीरामपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवाजी नथ्थू कुवर (वय48) हे दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.15 वाजता रुग्णाची तपासणी करीत असतांना अक्षय उर्फ बंटी किसन चौरेसह तिघांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करुन अक्षय चौरे याने डॉ.कुवर यांची कॉलर पकडून हाताबुक्क्यांनी मारहाण केली तर इतर दोघांनी शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी डॉ. रेवाजी कुवर यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भादंवि 353, 504, 506, 34 प्रमाणे अक्षय उर्फ बंटी किसन चौरे, दिनेश तुकाराम चौरे, अविनाश किसन चौरे रा. शिरसोले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना नागेश सोनवणे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*