वीज पडून गव्हाणे येथील माय-लेक ठार

0

शिंदखेडा/कापडणे । दि.6 । प्रतिनिधी-शिराळे (ता.शिंदखेडा) शिवारातील शेतात वीज कोसळून गव्हाणे येथील माय – लेकीचा आज (दि.6) मृत्यू झाला. कापुस वेचत असतांना पाऊस सुरु झाल्याने या मायलेकी महामार्गालगतच्या एका झाडाखाली उभ्या होत्या.

दुपारी 3 वाजेच्या सुमारास या घटनेत सुरेखा दगडू पाटील(वय 42) व मुलगी मोनीका दगडू पाटील (वय 20) ह्या माय लेकींचा दुर्दैवी अंत झाला.

 

या घटनेने गावासह शोककळा पसरली आहे. दोन दिवसापुर्वीच राज्य शासनाने वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्यांना 4 लाखाच्या मदतीचा निर्णय जाहीर केला. याअंतर्गत या कुटुंबास तात्काळ मदत मिळण्याची मागणी होत आहे.

गव्हाणे येथील धनराज मंगा पाटील यांचे गव्हाणे फाट्यानजीक, मारुती मंदिरासमोर शेत आहे. महामार्गालगतच्या या शिराळे शिवारातील शेतात या माय लेकींसह मजुर महिला कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या.

दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे काम थांबवून गव्हाणे (ता. शिंदखेडा) येथील सुरेखा दगडू पाटील(वय 42) व मुलगी मोनीका दगडू पाटील (वय 20) ह्या माय-लेकी झाडाखाली उभ्या राहिल्या.

त्यात त्यांच्यावर वीज कोसळून त्या जागीच ठार झाल्या. इतर महिला काही अंतरावरच उभ्या होत्या. या घटनेनंतर सपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

सुरेखा पाटील या गव्हाणे येथील दगडू विश्राम पाटील यांच्या सुविद्य पत्नी होत. दगडू पाटील यांच्याकडे केवळ दीड बिगे जमिन असल्याने आपल्या शेतीतील कामे काही दिवसात आटोपून उरलेल्या दिवसात या माय लेकी संसारास हातभार लावत होत्या.

मयत सुरेखा पाटील यांना एक मुलगा व दोन विवाहीत मुली आहेत. मयत मोनाली ही लहान मुलगी होती. या मायलेकींवर नरडाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसर्‍या एक घटनेत सुकवद येथेही सर्जेराव पाटील यांच्या शेतातील जागल्याच्या झोपडीवरही वीज पडून, झोपडीतील साहित्य झोपडी सह जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने मात्र जीवीतहानी झालेली नाही.

LEAVE A REPLY

*