दरोडखोरांची टोळी गजाआड

0

धुळे । दि.6 । प्रतिनिधी-दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला मोहाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तवेरा गाडीसह पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

पोलिस अधिक्षक एम.रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांना शहरात सराईत गुन्हेगार आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांना संशयीत वाहनांची तपासणी करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.

मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीत पोसई/राजपूत तसेच सतर कर्मचारी पेट्रोलिंगवर फिरत असतांना दि. 29 सप्टेंबर रोजी पहाटे मोहाडी येथे मेहबुब सुबाणी दर्गाकडे जाणार्‍या रोडवर तवेरा गाडी (क्रमांक एमएच 5/बी.जी.2009) संशयीतरित्या उभी दिसली. सदर वाहनात काळूराम गंगाराम भंडारी (वय30) रा. हेतुरणे गाव बदलापूर पाईप लाईन रोड डोंबिवली पुर्व, नाजीम उर्फ समीर मुस्ताक कुरेशी (वय 26) व्यवसाय मजुरी रा. झारेकर गल्ली अहमदनगर, सागर आनंदा तवले (वय2) व्यवसाय मजुरी रा. वाकलनरोड एसआरपीएफ कॅम्पजवळ बाळेगाव नवी मुंबई, शरद पांडूरंग पाटील (वय 26) व्यवसाय मजुरी रा. बुर्द्रूले मलंगगडच्या पायथ्याशी ता. अंबरनाथ ठाणे तसेच अजय दराडे रा. केळगावदेवी अहमदनगर हे 4 लाख 46 हजार 950 रुपये किंमतीचे कुकरी, तलवार, लाकडी दांडका, नॉयलॉन दोरी, मिरची पुड, रोख रक्कमेसह दरोडा घालण्याच्या तयारीने मिळून आले.

वरील पाचही आरोपीतांविरुध्द मोहाडी नगर पोस्टेला भाग 5 गुरनं.111/2017 भादंवि कलम 399,402, सह भा.ह.का.कलम 3/25 तसेच 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीतांची पोलिस कस्टडी घेण्यात आली. त्यात आरोपी नाजीम उर्फ समीर मुस्ताक कुरेशी रा. झारेकर गल्ली अहमदनगर याने त्यांचा गुन्ह्यातील फरार आरोपी याने त्याच्यासोबत असलेले दोन पिस्तूल हे नगर येथे कृष्णा प्रताप कुंदरकर याच्या घरी ठेवलेले असल्याचे सांगीतले.

नाजीम कुरेशी याच्यासह तपास अधिकारी पोसई/राजपूत व स्टॉप अशांनी दि.5 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे जावून फरार आरोपी अजय दराडे याच्याकडील दोन पिस्तूल, एक एअर गन व चार जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोस्टेचे सहा. पोलिस निरीक्षक जयंत बी.शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील राजपूत, असई/रामराजे, हवालदार रवींद्र दराडे, देवेंद्र परदेशी, शाम निकम, राजेंद्र मराठे, प्रभाकर ब्राम्हणे, पो.ना.सुनिल भावसार, शरद पाटील, पोकॉ अविनाश गहिवड, गणेश भामरे, आरीफ पठाण, जितेंद्र वाघ, चालक विकास शिरसाठ अशांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील राजपूत हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*