निती आयोगाच्या प्रस्तावित विधेयकाला निमाचा विरोध

0

धुळे । दि.6 । प्रतिनिधी-निती आयोगाच्या प्रस्तावित विधेयकाच्या विरोधात निमातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यात डॉक्टर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, नॅशनल इंन्टीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ही आयुर्वेद युनानी व सिध्द या भारतीय चिकित्सकांची देशव्यापी संघटना आहे.

विविध पाड्या, वस्त्यांमध्ये संघटनेचे सदस्य असलेले डॉक्टर मानवतेच्या दृष्टीकोनातुन सेवा पुरवित आहे. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात डॉक्टर स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून राष्ट्रसेवा करीत आहेत.

आरोग्य संघटनेच्या तत्वानुसार 400 जनसंख्येमागे एक डॉक्टर असे निकष असतांना 1700 लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे चित्र आहे.

हे प्रमाण 700 लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे जरी झाले तरी डब्ल्यू एचओच्या मार्गदर्शक निकषाच्या जवळ जातात येईल. मात्र निती आयोगाच्या प्रस्तावित एनसीआयएसएम विधेयकात अनेक मुद्दे डॉक्टरांना त्रासदायक ठरणार आहे.

यामुळे आरोग्य सेवा देणे अशक्यप्राय होणार आहे. या विधेयकामुळे केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद बरखास्त होणार आहे. त्याचप्रमाणे इंडियन मेडिसिन सेंट्रल कौन्सिलचा 1970 चा कायदा रद्द होणार आहे.

योग व निसर्गोपचार शास्त्रांचा समावेश भारतीय चिकित्सा पध्दतीमध्ये समाविष्ठ होणार असल्याने औषध शास्त्राचे ज्ञान नसणारे लोकही डॉक्टर बननणार आहेत.

भारतीय चिकित्सा पध्दती डॉक्टर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या प्रॅक्टीसमध्ये करु शकणार नाही. आरोग्य विषयक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी डॉक्टरांना बहाल झालेले अधिकार रद्दबातल होणार आहेत.

अशा अनेक जटील समस्या या विधयकामुळे निर्माण होणार असून शासनाने याचा विचार करावा अशी मागणी आयएमएने केली आहे.

आंदोलनात निमा अध्यक्ष डॉ.दिपक पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष डॉ.जगदीश देशमुख, एमसीआयएम सदस्य डॉ.एस.टी. पाटील, सचिव डॉ.विजय पाटील, कोषाध्यक्ष डॉ.योगेश पाटील, अध्यक्ष निमा पुमन फोरम डॉ.राजश्री शिरपूरकर, सचिव निमा पुनम फोरम डॉ.माधवी गींदोडीया, कोषाध्यक्ष निमा पुनम फोरम डॉ.नंदीनी मोरे सर्व कार्यकारिणी व सदस्य निमा, निमा वुमन फोरम धुळे आदी सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*