शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संपर्क साधा! – हर्षदा बडगुजर

0

धुळे । दि.6 । प्रतिनिधी-बँक खाते बंद, बँक क्रमांक चुकीचा यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांची अखर्चित रक्कम विभागाच्या शिष्यवृत्तीच्या बँक खात्यामध्ये आहे.

अशा सर्व विद्यार्थ्यांचे बरोबर बँक खाते क्रमांक मुख्याध्यापकांनी प्राप्त करुन 15 ऑक्टोबर 2017 पर्यंत समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, धुळे येथे संपर्क साधावा, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्रीमती बडगुजर यांनी म्हटले आहे, 2014- 2015 व 2015- 2016 या शैक्षणिक वर्षात अस्वच्छ व्यवसायात काम करणार्‍या पालकांच्या पाल्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, नववी व दहावी प्री मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती अनुसूचित जाती मुले व मुली, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती पाचवी ते सातवी मुली.

या शिष्यवृत्तीचा अर्ज भरला होता. मात्र, त्यांचे बँक खाते बंद, बँक क्रमांक चुकीचा असल्यामुळे शिष्यवृत्ती मिळालेली नाही.

अशा सर्व विद्यार्थ्यांची अखर्चित रक्कम विभागाच्या शिष्यवृत्तीच्या बँक खात्यामध्ये आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे बरोबर बँक खाते क्रमांक मुख्याध्यापकांनी प्राप्त करुन 15 ऑक्टोबर 2017 पर्यंत समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, धुळे यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*