कथ्थक नृत्यातून बालकलाकारांनी जिंकली रसिकांची मने !

0

धुळे । दि.6 । प्रतिनिधी-शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात नृत्यमयी संस्थेच्या विद्यार्थीनींच्या कथ्थक नृत्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ प्रा.सौ. राजश्री शहा होते तर उमविचे प्रथम कुलगुरू प्रा.डॉ.एन.के. ठाकरे, ज्येष्ठ साहित्यीक व नाटककार प्रा.डॉ.अनिल सोनार उपस्थित होते.

या कार्यक्रमात संगीत म्हणजे गायन, वादन, नृत्याचा संगम आहे.नृत्यामुळे शारिरीक व अभ्यासाची एकाग्रता वाढते. तसेच मनप्रसन्न, स्थिर, शांतता, ताणतणाव विसरायलाही नृत्याची मदत होते.

यापलीकडे जावून शरिराची जैविक लय जिला आपण बायोलॉजिकल रिदम असे म्हणतो ती सुधारण्यास नृत्य अतिशय उपयुक्त आहे. सर्व निसर्गात लय आहे.

ग्रह, तारे परिक्रमण, पृथ्वीचे फिरणे, ऋतुचक्रे, सुर्याचे उगवणे मावळणे ही निसर्गाचे लय आहे. तसे शरिराची लय असते त्यावर सर्व अवलंबून असते.

हृदयाची स्पंदने, रक्ताभिसरण, चयापचय क्रिया या लयबद्ध पद्धतीने सांभाळल्या जातात. त्यामुळे शरीर व्याधीमुक्त असते. मात्र चुकीच्या आचार-विचारांची लय बिघडली की व्याधी वाढतात.

नृत्यामुळे मुळ लय मिळतेे व बायोरिदम सुधारते. या सर्व बाबींची पूर्तता प्रत्येक कलाकारांच्या कृतीतून जाणवत होती. लहानातला लहान कलाकारदेखील जीव ओतून नृत्य करीत होता.

शालेय अभ्यासाच्या व्यतिरिक्त मिळणार्‍या वेळातून हे शिक्षण घेतले पाहिजे, असे देखील त्यांचे मत आहे. मात्र ह्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले पाहिजे.

मात्र पालकांमध्येच याबाबत विसंगत असल्याची खंत संस्थाचालकांनी बोलून दाखवली. इतर नृत्यापेक्षा कथ्थक नृत्यास जास्त मेहनत घ्यावी लागते.

नृत्यमयीच्या सर्वेसर्वा सौ. संध्या कोहक यांनी विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतल्याचे विद्यार्थ्यांच्या नृत्य कलेतून दिसून येत होते. सारे धुळेकर नागरीक या कार्यक्रमाने मंत्रमुग्ध झाल्याचे त्यांच्या चेहर्‍यावरील समाधानाने जाणवत होते.

मतीमंद मुलांच्या राष्ट्रगीताने नृत्यमयीचा बहारदार कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमास जयहिंद संस्थेचे चेअरमन डॉ.अरूण साळुंखे, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*