नीशा माळीची राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी निवड

0
शिरपूर | प्रतिनिधी :  शिरपूर येथील एच.आर.पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची खेळाडू निशा संजय माळी हिची बेंगलोर येथे होणार्‍या ४० व्या राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशन मार्फत १९ वर्षे आतील मुलींची निवड चाचणी नुकतीच सांगली येथे घेण्यात आली. यात निशा माळी हिची स्तुत्य निवड करण्यात आली असून गेल्या वर्षी देखील शालेय हॅण्डबॉल १७ वर्षे आतील गटात तिने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते.

ती राष्ट्रीय खेळाडू असून शिरपूर येथील मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध व्यापारी काशिनाथ सोमा माळी यांची नात आहे. थाळनेर पोलिस ठाण्याचे हे.कॉ. संजय माळी यांचे मुलगी आहे.गुजरात भारतीय खेल प्राधिकरण येथे भारतीय हॅण्डबॉल प्रशिक्षक शशी धुमाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगरध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, नगरसेवक तथा टेक्सटाईल पार्क चेअरमन तपनभाई पटेल, धुळे जिल्हा हॅण्डबॉल सचिव प्रा.डॉ. नरेश बागल, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, मुख्य वित्त अधिकारी नाटुसिंग गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, प्राचार्या सौ. एम.एस.अग्रवाल, पर्यवेक्षक पी.आर.साळुंखे यांनी कौतुक केले.

तिला क्रीडा शिक्षक पी.बी.धायबर, श्रीमती एस.एस.जोशी, हरीष सोनवणे, भूषण चव्हाण, राजेश मोरे, करण शिंदे, संस्थेचे हॅण्डबॉल प्रशिक्षक सचिन सिसोदिया, रोहित बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*