शंभर किलो भांग जप्त

0

धुळे । दि.5 । प्रतिनिधी-शहरातील वडजाई रोडवरील पुलाजवळ एका रिक्षातून शंभर किलो कोरडा भांग पोलिसांनी पकडला. भांग व रिक्षा असा 35 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुध्द आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील वडजाई रोडवरील पुलावर एमएच 18 डी 8020 क्रमांकाची रिक्षा संशयास्पदरित्या जात असताना पोलिसांना आढळली.

पोलिसांनी रिक्षा थांबविण्याचा इशारा केला असता दोन जण रिक्षा सोडून पळून गेले. रिक्षाची तपासणी केली असता त्यामध्ये पांढर्‍या रंगाच्या चार गोण्यांमध्ये 100 किलो वजनाची कोरडी भांग आढळून आली.

पोलिसांनी 20 हजाराची भांग आणि रिक्षा असा 35 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोना कुणाल पानपाटील यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरुन अनिस शेख नथ्थू आणि शोएब शेख अनिस, दोघे राहणार अंबिकानगर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ ए.आर.चव्हाण हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*