गटशिक्षणाधिकारी देवरे लाच घेतांना गजाआड

0
धुळे |  प्रतिनिधी  : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुळे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.सुरेखा देवरे यांना आज ९००० रुपयांची लाच घेताना अटक केली.

रात्री उशीरा देवरे यांच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली. पोलिस उप अधिक्षक शतुध्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर व पथकाने ही कारवाई केली.

याबाबत माहिती अशी की, आज गटशिक्षण अधिकारी सौ सुरेखा देवरे यांनी २७ शिक्षकांना हजेरी पुस्तकात हजेरीची नोंद करून दाखला देण्यासाठी प्रत्येकी ३००० रूपयांची मागणी केली होती. त्यानुसार काही शिक्षकांना देवरे यांनी आज पैसे घेऊन घरी बोलावले. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

*