स्थायी सभेत अतिक्रमितधारकांचा मोर्चा

0
धुळे  / शहरातील देवपूर परिसरात असलेल्या नवरंग जलकुंभ मैदानावरील अतिक्रमणे काल महापालिका प्रशासनाने काढली.
त्यामुळे सदर अतिक्रमीतधारक रस्त्यावर आले आहेत. त्यांना पर्यायी जागा द्यावी, या मागणीसाठी स्थायी सभेत अतिक्रमण धारकांनी मोर्चा आणला व प्रशासनाला निवेदन दिले.

नवरंग जलकुंभ मैदानावर गेल्या 30 वर्षांपासून रितसर महापालिकेचा करही भरुन आम्ही व्यवसाय करीत आहोत. यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो.

अपंग, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला व तरुणवर्ग या ठिकाणी व्यवसायासाठी धडपड करतो, परंतु दि.24 मे रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता या जागेवरील सर्व दुकाने काढून टाकली.

यावेळी मोठ्या प्रमाणात साहित्याची तोडफोडही झाली. अतिक्रमणे काढल्यामुळे आता व्यवसायासाठी पर्याय उरलेला नाही. यामुळे आमचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. तरी आम्हाला पर्यायी जागा देण्यात यावी, या मागणीसाठी स्थायीत मोर्चा आणला.

 

LEAVE A REPLY

*