धमनार ग्रा.पं.सरपंचविरोधात अविश्वास ठराव दाखल

0
साक्री / तालुक्यातील धमनार ग्रामपंचायतीचे सरपंच पुष्पाबाई प्रेमराज सोनवणे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांकडून अविश्वास ठरावासाठी तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देण्यात आले.
धमनार ग्रामपंचायत सदस्यांकडून सरपंच यांच्या कार्यपद्धतीवर अनेक दिवसांपासून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या नाराजीमुळे ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांकडून आज दि 24 रोजी तहसिलदार संदिप भोसले यांना निवेदन देवून अविश्वास ठराव पारित करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या विशेष सभेची मागणी करण्यात आली आहे.

यामुळे तहसीलदारांनी दि 30 रोजी धमनार ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावली असून या सभेत अविश्वास ठरावासाठी 13 सदस्यांपैकी 9 सदस्यांनी मत देणे गरजेचे राहील असे घडले तरच सरपंच विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यात येईल.

आपल्या दीड वर्ष्याच्या कालावधीत सरपंच यांनी विषय समित्यांची स्थापना न करता स्वतःच सर्व कारभार पहिला तसेच मासिक सभा व ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी केली नाही.

शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली नसून त्या राबविण्यात देखील असमर्थता दाखविली आहे.

 

LEAVE A REPLY

*