अहिराणी साहित्यातून परंपरा जोपासली

0
धुळे / खान्देशनी वानगी या अंकातून अस्सल अहिराणीची साहित्य परंपरा जोपासली जात असून त्याच्या संवर्धनासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे व भाषा रसिकांचे काम आहे असे प्रतिपादन कवी प्रभाकर शेळके यांनी केले.
अंकुर साहित्य संघाच्यावतीने अहिराणी त्रैमासिक खान्देशनी वानगीचे प्रकाशन व कवीसंमेलन घेण्यात आले.

या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रभाकर शेळके होते. कवी संमेलनात कवी रमेश बोरसे, प्रा.सदाशिव सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केलेेेे.

अहिराणी साहित्यासाठी वाहिलेले एकमेव वाड्मयीन पुस्तक म्हणून खान्देशनी वानगीचे प्रकाशन साहित्यिकांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*