पिंपळनेर येथे क्रीडा संकुलाचे भूमीपूजन

0
पिंपळनेर । वार्ताहर-पिंपळनेर येथील आदिवासी नृत्य स्पर्धाचे व दोन कोटी 16 लाखाचे क्रीडा संकुलनाच्या भूमीपूजनाचे उद्घाटन खा. हिना गावीत व आ. विजयकुमार गावीत यांनी वचनपुर्ती करत केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कांतीलाल टाटीया होते.
पिंपळनेर येथील सद्गुरु प.पू.खंडोजी महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त जागरणची रात्र (सोंग व वहन), कुस्त्यांची दंगल व आदिवासी नृत्य स्पर्धांचे आयोजनाने सांगता होते. गेल्या वर्षी खा. हिना गावीत व आ.डॉ.विजयकुमार गावीत यांनी उपस्थिती दिली होती. त्यावेळी खा. डॉ.हिना गावीत यांनी पिंपळनेरकरांना शब्द दिला होता. तो शब्द पाळत खा.हिना गावीत यांनी केंद्र सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या निधीतून 2 कोटी 16 लाख रुपये मंजूर केले व या क्रीडा संकुलाच्या भूमी पुजन श्रीफळ व टीकाव मारुन केले व वचनपुर्ती केली.

यावेळी खा. हिना गावीत म्हणाल्या, माझ्या आदिवासी बांधवांना उन्हात, पावसात कुस्त्या व आदिवासी नृत्य पहावे लागत होते. 189 वर्षाची परंपरा असलेला यात्रोत्सव बघून या ठिकाणी भव्य स्टेडीयम व क्रीडा संकुल तयार करण्याचा निर्णय घेतला. केंद्रात मी आदिवासी विकासमंत्री ना. ज्यु.एल. ओराम यांचेकडे प्रस्ताव सादर केला. येथील यात्रा व उत्सवाची माहिती दिली.

आदिवासी भागातील खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. आणि केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने 2 कोटी 16 लाख रुपये मंजूर केले. पुढील वर्षी या ठिकाणी स्टेडीयम उभे राहिल. आदिवासी भागात शेवटच्या टोकापर्यंतच बी.एस.एन.एल.चे नेटवर्कही थेट देण्याचा मनोदय आहे. ऑनलाईन सेवा माझ्या आदिवासी भागातील गॅसधारक ते विद्यार्थी, शेतकर्‍यांना वर्षभरात देणार, असेही सांगितले. तसेच आदिवासी भागातील जंगल नष्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आदिवासींनी त्याला सहकार्य करावे असे सांगितले.

यावेळी आ.डी.एस.अहिरे, आ. विजयकुमार गावीत, अ‍ॅड. संभाजीराव पगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, कांतीलाल टाटीया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तोरणमाळ, तळोदा, आहवाडाां, गुजरात, अहमदनगर, नासिक, सटाणा येथील आदिवासी नृत्य संघांनी सहभाग घेतला होता. नंदीनृत्य, भोंगर्‍या नृत्य, आदिवासी टीपरी, डोंगर्‍यादेव, शंकर पार्वती नृत्य सादर झालेत.

व्यासपीठावर हभप योगेश्वर महाराज (विठ्ठल मंदीर संस्थान), महंत सर्वेश्वर दास, खा. हिना गावीत, आ. विजयकुमार गावीत, आ.डी.एस.आहिरे, कांतीलाल टाटीया, बबनराव चौधरी, अ‍ॅड. संभाजीराव पगारे, जि.प.सदस्य अ‍ॅड. ज्ञानेश्वर एखंडे, सरपंच सौ. हारजाबाई पवार, उपसरपंच योगेश नेरकर, सौ. मंजुळा गावीत, डॉ. तुळशिराम गावीत, इंजि. मोहन सुर्यवंशी, सुरेश पाटील, तहसिलदार वाय.सी.सूर्यवंशी, प्रमोद गांगुर्डे, रामकृष्ण एखंडे, एपीआय सुनिल भाबड, वसंत घरटे, कार्यकारी अभियंता ठाकूर, प्रदीप कोठावदे, वसंत बच्छाव आदी उपस्थित होते.

पिंपळनेरची यात्रा एक दिवस वाढवावी म्हणून विठ्ठल मंदिराचे मठाधीपती हभप योगेश्वर महाराजांनी कुस्त्या झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी आदिवासी नृत्य स्पर्धा भरवावी असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर त्यांना वाणी समाज अध्यक्ष जयवंत बागड, देवीदास चौधरी, धनराज राजमल जैन, रिखबचंद सुमेरमल जैन, एकनाथ दगडू कोठावदे, प्रकाश रामदास विसपुते, प्रकाश हरी कोतकर, राजेंद्र देवीदास पेंढारकर, देवेंद्र मुरलीधर गांगुर्डे, दयाराम निंबा महाराज, काका जगन्नाथ शिरसाठ यांनी 2015 मध्ये स्वखर्च व स्वत: बक्षिस ठेवून या आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन करुन सुरवात केली होती. तेथूनच या आदिवासी नृत्य स्पर्धेला सुरवात झाली होती. यावर्षी ही जवळपास संघांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन नृत्य समितीने केले होते. सुत्रसंचालन सुभाष महाजन यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*