मजूर महिलेला सव्वा दोन लाखात गंडविले

0
धुळे । दि.31 । प्रतिनिधी-एटीएममधून पैसे काढून देण्याचा बहाणा करुन पिनकोड नंबर विचारुन नंतर एटीएम कार्डची अदलाबदल करुन दोन लाख 39 हजार रुपये परस्पर काढून घेवून महिला मजुराची फसवणूक केली. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथे राहणार्‍या मोतनबाई नारायण सोनवणे या मोलमजूरी करतात. त्यांना दवाखान्यासाठी एक हजार रुपये बँकेतून काढावयाचे होते.

त्यासाठी त्या त्यांची मुलगी रुपालीसह एटीएममध्ये गेले तेथे अज्ञात व्यक्तीने पैसे काढून देण्याच्या बहाण्याने मोतनबाईचा विश्वास संपादन करुन पिनकोड नंबर त्या अज्ञात व्यक्तीने विचारला व पैसे काढून दिले.

त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्डची अदलाबदल केली व दि. 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान मोतनबाई सोनवणे यांच्या खात्यावरुन दोन लाख 39 हजार रुपये काढून फसवणूक केली.

याबाबत मोतनबाई नारायण सोनवणे यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*