जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक विचारांची गरज !

0
धुळे । दि.31 । प्रतिनिधी-शेती, उद्योग आणि सुवर्ण व्यवसायाच्या माध्यमातून बाजारपेठेत सतत उलाढाल सुरु असते.सामान्य माणसाच्या आर्थिक विकासाशी निगडीत ही क्षेत्रे आहेत.
प्रत्येक क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होणे शक्य आहे. त्यासाठी सकारात्मक विचारसरणीची गरज असून नियमांचे पालन करणे, नव्या गोष्टींचा स्वीकार करणे यावर प्रत्येकाने भर दिला पाहिजे.
त्यातून धुळे जिल्ह्याच्या विकासाचे नवे रुप पहायला मिळेल, असा आशावाद विविध मान्यवरांनी व्यक्त केला. दै.देशदूत कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची आरती झाली.

त्यावेळी झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी महापौर सौ.कल्पना महाले, उद्योजक नितीन बंग, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे, पी अ‍ॅण्ड जी ज्वेलर्सचे धुळे व्यवस्थापक संदीप पोतदार यावेळी उपस्थित होते.

चर्चासत्रात मान्यवरांनी धुळे जिल्ह्याची सद्य:स्थिती, सर्वांगिण विकासासाठी आवश्यक प्रयत्न आणि त्यासाठी जनतेची साथ यावर भर दिला. जिल्ह्यातील नरडाणासह औद्योगिक विकासाला आता कोठे चालना मिळत आहे, ती गती वाढायला पाहिजे.

एकेकाळी धुळे जिल्हा डाळींब उत्पादनात आघाडीवर होता. मात्र, शेतकर्‍यांनी उत्पादन घेतांना आवश्यक ती काळजी घेतली नाही.

परिणामी आज डाळींबाचे उत्पन्न कमी होत आहे. धुळे शहराच्या व्यापारी वर्गाला भेडसावणार्‍या समस्या सुटल्या पाहिजेत त्यात वाहतूक, पार्किंग यावर भर दिला पाहिजे.

मनपात नव्याने समाविष्ट होणार्‍या गावांना सुविधा पुरविणे आणि धुळेकरांसाठी 136 कोटींची योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेणे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी मान्यवरांच्या चर्चेतून स्पष्ट झाले.

भविष्यात धुळेकरांची साथ मिळाली तर औद्योगिक भरभराट होईल. व्यापाराला चालना मिळेल आणि ममूा यंत्रणेमार्फत सर्व क्षेत्रांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मान्यवरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*