सिनेअभिनेता दिनो मारीया यांची शिरपूर भेट

0
शिरपूर । प्रतिनिधी-शिरपूरटेक्स्टाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल यांचे मुंबई येथील घनिष्ठ मित्र, सिने-अभिनेता दिनो मारीया आणि प्रणव प्रेमनारायण यांनी आज दिवसभर शिरपूर शहराची पाहणी केली.
मुंबई येथील सिने-अभिनेता दिनो मारीया व मुंबई येथील प्रणव प्रेमनारायण यांनी शिरपूर शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या.
शिरपूर नगरपरिषदेच्या डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मुकेशभाई पटेल गार्डन, आर.सी.पटेल इंजिनिअरींग कॉलेज, आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज यासह अनेक ठिकाणी भेटी देवून खूपच आनंद व्यक्त केला.

शिरपूरसारख्या छोटयाशा शहरात आ. अमरिशभाई पटेल, स्व.खा. मुकेशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी निर्माण केलेल्या अनेक प्रकल्पांची पाहणी केल्यावर त्यांनी खूपच बोलक्या व चांगल्या प्रतिक्रिया दिल्या.

तसेच शिरपूर टेक्स्टाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल यांच्यासह नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्याकडून बरीचशी माहिती जाणून घेतली.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिने-अभिनेता दिनो मारीया यांच्या समवेत सेल्फीचा आनंद लुटला.

याप्रसंगी शिरपूर टेक्स्टाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, वित्त अधिकारी नाटुसिंग गिरासे, प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर, रजिस्ट्रार प्रशांत महाजन, धिरज देशमुख, हृदय परते, अधिाकरी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*