सोलो, ग्रुप डान्सच्या स्पर्धेत महिलांतर्फे कलागुणांचे सादरीकरण

0
धुळे । दि.31 । प्रतिनिधी-शहरातील देवपूरमधील इंदिरा गार्डन परिसरातील वंदे मातरम प्रतिष्ठानने गणेशोत्सवानिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सोलो व ग्रुप डान्स स्पर्धा घेतली.
त्यामध्ये युवतींसह ज्येष्ठ महिलापर्यंत 50 पेक्षा अधिक स्पर्धक महिलांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. ही स्पर्धा तीन ते साडेतीन तास रंगली.

विविध चित्रपट गिते आणि संगीतावर विविध गटातील महिलांनी ग्रुप डान्स सादर केला. नृत्याचे विविध प्रकार युवती, महिलांनी सादर केल्यामुळे उपस्थित रसिक महिला श्रोत्यांचे डोळ्यांचे पारणे फिटले.

राष्ट्रभक्तीच्या गितांवर स्पर्धक महिलांनी उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण करत वाहवा मिळविली. नृत्यामधून भारतीय परंपरेचे दर्शन घडविले.

त्याला टाळ्यांच्या कडकडाटाने रसिकांकडून दाद दिली गेली. वंदे मातरम या राष्ट्रभक्तीच्या गितावरील नृत्याने सर्वांची दाद मिळविली.

85 वर्षांच्या आजी सहभागी
स्पर्धेत वंदे मातरम या राष्ट्रभक्तीवरील गितावर झालेल्या नृत्यात 45 वर्षे वयोगटावरील महिला स्पर्धकांचा समावेश होता. त्यात सर्वाधिक 85 वर्षे वयाच्या आजी या स्पर्धक होत्या.

त्यांना रसिकांकडून टाळ्यांच्या कडकडाटाने भरभरून प्रोत्साहन देण्यात आले. या गितावरील नृत्यात सुलभा कुवर, सुनंदा खैरनार, रूपाली चित्ते, शोभा पाटील, शोभना पाटील (वय 85), सुनंदा पाटील, विजया राजपूत (वय 72), मनिषा भावसार, उर्मिला पाटील, चंद्रकला पाटील, सुरेखा नांद्रे, अरूणा बोरसे सहभागी झालेल्या होत्या. हर्षल अहिरराव कोरिओग्राफर होते.

 

LEAVE A REPLY

*