बनावट कागदपत्रांच्या आधारे ठिबक कर्ज : सहा लाखांचा अपहार – बँक अधिकार्‍यासह सात जणांविरूध्द गुन्हा

0
अमराळे, ता.शिंदखेडा  :  शिवारातील शेत मिळकतीवर ठिबक करण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून ठिबक कर्ज मंजूर करुन सहा लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालिन बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन अधिकार्‍यांसह सात जणांविरुध्द दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, अमराळे, ता.शिंदखेडा येथे राहणार्‍या आशाबाई दिलीप पाटील, दिलीप पाटील व आशाबाईंचे सासरे यांच्या मालकीचे अमराळे शिवारात गट क्र.७३/१, १७३/२, १७३/३ या मिळकतीवर शेतजमिन आहे.

या शेतजमिनीवर ठिबक करण्यासाठी संभाजी उर्फ संदीप वसंत पाटील (देसले) यांच्यासह सात जणांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रे बनवून सहा लाखांचा डिमांड ड्राप्ट बँक ऑफ महाराष्ट्रचे तत्कालिन शाखाधिकारी ए.बी.कोकणी आणि तत्कालिन कर्ज अधिकारी जे.जे.पाटील यांनी चेतना ऍग्रो एजन्सीच्या नावे करुन खात्यात टाकला व ठिबक कर्ज मंजूर करुन सहा लाखांचा अपहार करुन शासनाची फसवणूक केली, अशी फिर्याद आशाबाई दिलीप पाटील यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिली.

भादंवि ४२०, ४०६, ४०९, ४१८, ४१९, ४६८, १२० (ब), ३४ प्रमाणे चेतना एजन्सीचे संभाजी उर्फ संदीप वसंत पाटील, ठिबक एजंट रणजितसिंग आनंदसिंग गिरासे, मनोज मगन वाणी, भगवान पंडीत देशमुख, रतिलाल कौतिक पाटील, तत्कालिन शाखाधिकारी ए.बी.कोकणी, तत्कालिन कृषी कर्ज अधिकारी जे.जे.पाटील यांच्याविरुध् गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*