पतपेढ्या बुडविणार्‍यांवर कारवाई करा !

0

धुळे । दि.31 । प्रतिनिधी-धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पतपेढ्या बुडविणार्‍यांवर ई.डी.मार्फत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रीकांत गिंदोडिया यांनी केली आहे.

याबाबत विभागीय सहनिबंधक सहकारी नाशिक यांना लेखी पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील पतसंस्थांमधील ठेवीदारांनी केलेल्या अर्जांवर सुनावणी करतांना विभागीय आयुक्त श्री.झगडे यांनी सुमारे 100 बुडीत पतसंस्थांची सक्त वसुली संचालनालयामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पतपेढ्या बुडविणार्‍यांवर ईडीमार्फत कारवाई करण्याची मागणी श्रीकांत गिंदोडिया यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*