जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍याची आत्महत्या

0
धुळे । दि.30 । प्रतिनिधी-पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी होईल या नैराश्यातून पतीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरानजीक असलेल्या मोहाडी येथे घडली.
या प्रकरणी मयताच्या पत्नीसह सात जणांविरूध्द मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आत्महत्येपुर्वी मयताने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरानजीक असलेल्या मोहाडी येथे राहणारा हेमंत रमेश सातभाई (वय40) याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याबद्दल त्याच्या सासरवाडीला त्याने सांगितले.

परंतु सासरकडील नातेवाईकांनी हेमंतलाच शिवीगाळ करून दमदाटी केली व त्याचा अपमान केला. पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत नातेवाईकांना समजल्यास आपली समाजात बदनामी होईल.

या नैराश्यातून राहत्या घरी हेमंतने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी फिर्याद मयताचे वडील रमेश काळू सातभाई यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरुन मयताची पत्नी राखी हेमंत सातभाई, शालक अमोल रमेश भामरे, सासू सुरेखा रमेश भामरे, साडू योगेश विसपूते,साली मेघा विसपुते, साडू दिनेश खरोटे, साली रिना दिनेश खरोटे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

आत्महत्येपुर्वी लिहिली चिठ्ठी
मयत हेमंत रमेश सातभाई हा भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात नोकरीला आहे. त्याने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहिली असून सदर चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.

LEAVE A REPLY

*