शिरपूरच्या .पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्रा.प्रवीण पाटील यांना कर्करोगावरील संशोधनासाठी 33 लाखांचे अनुदान

0
शिरपूर । प्रतिनिधी  :  येथील एच.आर.पटेल फार्मसी महाविद्यालयाचे औषधी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रवीण ओंकार पाटील यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे कर्करोगावरील संशोधनासाठी 33 लाखांचे अनुदान मिळाले आहे.

फंक्शनालाइझड फ्लूरोसन्स ग्रामिन क्वानटम डॉट बेस्ड सेन्सोर फॉर अर्ली डिटेक्टशन ऑफ लंग कॅन्सर अँड बायो-ईमेजिंग हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. कर्करोग हा दुर्धर आजार असून त्याचे योग्य व तत्काळ निदान न झाल्यास कर्करोगाचा उपचार प्रभाविपणे करणे शक्य होत नाही.

कर्करोगाच्या निदानासाठी उपलब्ध असलेल्या निदान पद्धती कर्करोगाचे अचूक निदान करण्यास फोल ठरत आहेत. यासाठी कर्करोगाचे निदान व उपचार पद्धतींत संशोधन करणे ही काळाची गरज आहे. प्रा. पाटील सदर संशोधनातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी जैव-संवेदानायुक्त निदान व उपचार पद्धती निर्माण करण्याच्या प्रयत्न करीत आहेत.

संशोधनाने मानवी शरीरातील कर्करोगजन्य जैव-पदार्थांचे प्रमाण आजाराच्या प्रथम अवस्थेतच शोधणे शक्य होईल व पुढील उपचारपद्धती कर्करोगाच्या रुग्णांसाठी आशादायी ठरेल. प्रा.पाटील यांचे शोधनिबंध विविध शोध पत्रिकांत प्रकाशित झाले असुन अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे.

यापूर्वी प्रा.पाटील यांना पंधरा लाखांचे संशोधन अनुदान मिळाले असून त्यांना दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. प्रा.पाटील हे तर्‍हाडी (ता.शिरपूर) येथील प्रगतशील शेतकरी व माजी उपसरपंच ओंकार दशरथ पाटील यांचे पुत्र आहेत. सदर यशाबद्दल आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, तपनभाई पटेल, प्रभाकर चव्हाण, डॉ.के.बी. पाटील, डॉ.एस.बी.बारी यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*