शिरपूर पटेल सैनिकी विद्यालयाचे स्पर्धेत यश

0
शिरपूर । दि. 30 । प्रतिनिधी-मुकेशभाई आर. पटेल मुला मुलींची सैनिकी शाळेच्या दहावीतील तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली.
महिला मतदार नोंदणी कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी आणि त्यासाठी जनमानसात प्रबोधन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

तांडे, शिरपूर येथील मुकेशभाई आर. पटेल सैनिकी शाळेच्या दहावीतील तीन विद्यार्थ्यांनी यात घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत शिरपूर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पाटील प्राजक्ता यशवंत, द्वितीय पारितोषिक हृतिक रवींद्र पवार व तृतीय आनंद संजय परदेशी या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे.

या तिन विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक शरद पवार, सतीश सोमवंशी, शशिकांत जाधव व दीपश्री गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. अमरीशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल, विश्वस्त राजगोपाल भंडारी, यशवंत बाविस्कर, प्राचार्य दिनेश राणा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

*