धुळे । दि.29 । प्रतिनिधी-शहरातील देवपूरमधील इंदिरा गार्डन परिसरात दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या कृतीशील कार्यातून वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.
केळी आणि मोदकच्या प्रसाद वाटपानंतर अनेक भाविकांनी केळीचे साल हे मंडपाभोवती व वर्दळीच्या ठिकाणी अस्ताव्यस्त फेकून दिले. केळीच्या सालावर कुणाचा चुकून पाय जरी पडला असता तर अपघाताची शक्यता नाकारता आली नसती.

हा प्रकार चावरा इंग्रजी शाळेतील बालवाडीची विद्यार्थीनी धानी व इयत्ता चौथीतील ओम सुशील बोरसे या भावंडांच्या लक्षामध्ये आली.

त्यांनी कोणाच्याच सूचनेची वाट न बघता उत्स्फूर्तपणे स्वतःहून केळींचे साल उचलून कचराकुंडीत टाकण्यास सुरूवात केली. बराच वेळ हे कार्य करत त्यांनी मंडपासमोरील परिसर स्वच्छ करून टाकला.

हे कार्य प्रतिष्ठानचे सदस्य डॉ. संदीप पाटील, शामकांत बोरसे, प्रा. सागर चौधरी, निलेश राजपूत, मिलींद बोरसे यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी या चिमुकल्या भावंडांच्या कामाचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

*