ट्रक टर्मिनल कार्यान्वित होणार

0
धुळे / शहर एकात्मिक विकास योजनेंतर्गत शासन अनुदानातून तयार होणारे ट्रक टर्मिनल लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती महापौर सौ.कल्पना महाले यांनी दिली.
सुमारे 15 ते 20 वर्षांपासून ट्रक टर्मिनलचे काम सुरु होते. प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे सदर काम प्रलंबित होते.

सदर कामाची आवश्यकता लक्षात घेवून महापौर सौ.महाले यांनी पाठपुरावा केला. सदर काम पूर्णत्वास आलेले असून या कामाची अंदाजपत्रकीय किंमत सुमारे 1.34 कोटी इतकी आहे.

यात सुमारे 30 गाळे बांधण्यात आलेली आहेत. तसेच मुलभूत सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र.3 पासून ट्रक टर्मिनलपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ट्रक टर्मिनल कार्यान्वित झाल्यास शहरात येणार्‍या अवजड वाहनांची संख्या कमी होवून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*