सौर उर्जा कंपनीतून कॉपर वायरची चोरी

0
धुळे । दि.28 । प्रतिनिधी-सालटेक, ता.साक्री येथील सौर उर्जा सोलर कंपनीतून 700 मिटर लांबीची कॉपर वायर सुमारे 41 हजार 500 रुपये किंमतीची अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याबाबत निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, सालटेक, ता.साक्री शिवारातील साईट क्र.45 येथील सौर उर्जा कंपनीत अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन 700 मिटर लांबीची कॉपर वायर 41 हजार 500 रुपये किंमतीची चोरुन नेली.

याबाबत बारकू शामराव पवार यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करणत आला. पुढील तपास पोना रायते हे करीत आहेत.

मोटारसायकल चोरी – शहरातील शिवप्रताप कॉलनीत राहणारे दीपक देवराम देवरे यांनी त्यांच्या मालकीची 19 हजार रुपये किंमतीची एमएच 19 बीबी 9538 क्रमांकाची मोटारसायकल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हॉटेल जयमल्हार समोर लावलेली होती. सदर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात दीपक देवरे यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
थाळनेर, ता.शिरपूर येथे राहणारे राजेंद्र शिवदास कोळी यांनी त्यांची 41 हजार रुपये किंमतीची एमएच 18 एएल 6312 क्रमांकाची मोटारसायकल शेताजवळील रोडवर लावलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरुन नेली. याबाबत राजेंद्र कोळी यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई चव्हाण हे करीत आहेत.

मक्याच्या कट्ट्याची चोरी – दोंडाईचा शिवारातील शेत क्र.149/1/3 मधील प्रज्ञा ऑईल मिल गोडावूनमधून अज्ञात चोरट्याने एमएच 14 एफ 3147 क्रमांकाची गाडी व त्यातील 40 ते 50 कट्टे असा 95 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात गणेश भुरमल बंब यांनी फिर्याद दिली. भादंवि 461, 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ कदम हे करीत आहेत.

तरुणाला मारहाण – शेवडीपाडा, ता.साक्री येथे राहणारे छोटू पांडू ठाकरे यांच्यासह त्यांचे मेहूणे संजय भाऊजी भोये हे मोटारसायकल काढत असताना पुष्पाबाई सुरेश चौधरी व त्यांचा मुलगा हे मोटारसायकलने तेथे आले. त्यांना सदर मोटारसायकलचा धक्का लागला. त्यामुळे दोघे जण खाली पडले. त्यामुळे दोघांनी छोटू पांडू ठाकरेशी वाद घातला व दोघांनी छोटूला मारहाण करुन दमदाटी केली. तसेच सुरेश चौधरी याने लोखंडी सळईने मारहाण केली. यात छोटू हा जखमी झाला. याबाबत छोटू पांडू ठाकरे यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे सुरेश चौधरी, पुष्पाबाई सुरेश चौधरी आणि त्यांचा मुलगा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात ठार – दोंडाईचा-इंदवे रोडने किशोर प्रभाकर पाटील हा भरधाव वेगाने ट्रक (क्र.एमएच 18 एम 5264) नेत असताना त्याने विनोद शिवाजी इंदीस (वय 23, रा.इंदवे) याला मागून धडक दिली. चाक डोक्यावरुन गेल्याने त्यात विनोद मयत झाला. याबाबत उत्तम श्रावण इंदीस यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे किशोर प्रभाकर पाटीलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

अभ्रक फेकले – सावळदे, ता.शिरपूर शिवारात महामार्गालगत उंटावद गावाच्या रोडवर राजाराम रामकृष्ण महाजन यांच्या मालकीच्या पडीत शेतात झाडाझुडपात अज्ञात महिलेने दोन ते तीन दिवसाचे पुरुष जातीचे अभ्रक पालन पोषणाची जबाबदारी असताना फेकून दिले. याबाबत गोरख मकन कोळी यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 417 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेचा छळ – आर्वी, ता.धुळे येथे राहणारी सौ.रुपाली ज्ञानेश्वर रामोळे या विवाहितेने घर बांधण्यासाठी माहेरुन 50 हजार रुपये आणले नाहीत म्हणून तिचा छळ केला. तसेच तिचा पती ज्ञानेश्वर अशोक रामोळे याने हाताबुक्क्याने मारहाण करुन दमदाटी केली, अशी फिर्याद सौ.रुपाली ज्ञानेश्वर रामोळे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे विवाहितेचा पती ज्ञानेश्वर अशोक रामोळे, सासू सुशिलाबाई अशोक रामोळे, सासरे अशोक सदा रामोळे, चुलत जेठ धुडकू ताराचंद राठोड, सासू विठाबाई धोंडू शिवदे, मावसा दयाराम रामचंद्र जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

विहिरीत पडल्याने मयत – नवापाडा, ता.साक्री येथे राहणारी योगिता मुरलीधर बहिरम (वय 22) ही दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता स्वत:च्या विहिरीवर सिताफळ तोडत असताना ती विहिरीत पडली. पाण्यात बुडूत तिचा मृत्यू झाला. याबाबत काशिनाथ गोपीचंद गांगुर्डे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जैतण्यात धिंगाणा – जैताणे, ता.साक्री येथे दारुच्या नशेत एकाने धिंगाणा घालून काचेच्या बाटल्या फोडल्या. ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. शानाभाऊ अंकुर धनगर याने दारुच्या नशेत गणेश मंडळासमोर धिंगाणा घातला. तसेच जोरजोरात आरडाओरड करुन बिअरबारमधील काचेच्या बाटल्या आणून फोडल्या. याबाबत निजामपूर पोलिस ठाण्यात राहूल जयस्वाल यांनी फिर्याद दिली. त्यावरुन शानाभाऊ धनगरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष घेवून बालकाचा मृत्यू
काळखेडा, ता.धुळे येथे राहणारा शाम शांताराम माळी (वय 12) याने दि.24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शेतात काहीतरी विषारी औषध घेतले. त्यामुळे त्याला त्रास होवू लागल्याने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार घेतांना दि.27 ऑगस्ट रोजी डॉ.दीपाली नरोडे यांनी तपासून शाम माळीला मृत घोषित केले. याबाबत पोकाँ डी.एस.गिरासे यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विहिरीत पडल्याने दोघांचा मृत्यू
कळंबीर, ता.साक्री शिवारात रामराव बुजा मारनर यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत भटू रामराव थोरात (वय 30) हा दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता जलपरी इलेक्ट्रीक मोटारीला पाईपला दोर बांधण्यासाठी विहिरीत उतरत असताना त्याचा तोल गेल्याने तो विहिरीच्या पाण्यात पडल्याने मयत झाला. याबाबत दशरथ भटू थोरात यांनी साक्री पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पिंपळनेर शिवारात भाऊसाहेब नंदन यांच्या शेतातील विहिरीत जगदीश श्रीकिरणसिंग राजपूत (वय 65) हा रिंग टाकण्याचे काम करीत असताना त्याला विजेचा धक्का लागल्याने तो विहिरीत पडला. त्याला साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी तपासून जगदीशला मृत घोषित केले. याबाबत नेमीचंद रामनिवास नेहरा यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*