ध्वनी प्रदूषण केल्यास वाद्यं वादकाला शिक्षा

0
धुळे । दि.28 । प्रतिनिधी-डेसीबलचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे वाद्य वाजकांनी उल्लंघन केल्यास कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
त्यात जास्तीत जास्त एक लाख रुपये दंड व पाच वर्षापर्यंत कारावास व उल्लंघन पुढे चालु ठेवल्यास प्रत्येक दिवशी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

उच्च न्यायालयाने महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या ध्वनी प्रदुषणाबाबत याचिकेवर दिलेल्या निर्णयात ध्वनी प्रदुषण नियम 2000 अन्वये रात्री 10 वाजेनंतर ध्वनिक्षेपकांवर बंदी आणल्या नंतरही अनेक शहरात, गावामध्ये सदर कायद्याचे उल्लंघन होत असल्याची बाब समोर येत असल्यामुळे ध्वनी प्रदुषण कायद्याची आगामी सण, उत्सवा दरम्यान प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस विभागामार्फत ध्वनी प्रदुषण प्राधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ध्वनी प्रदुषण नियम 2000 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील पोलीस ठाणे, जिल्हास्तरावर निहाय नेमण्यात आलेल्या ध्वनी प्रदुषण प्राधिकार्‍यांचे नाव, पदनाम, पत्ता व दुरध्वनी क्रमांक, ईमेल बाबत माहिती संकेतस्थळांवर संबंधीत विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आली आहेत.

ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) नियम 2000 चे कलम 3 (1), 4(1) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम सन 1986 चे कलम 6 अन्वये डेसीबलचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे.

त्याबाबत वाद्य वाजकांनी त्यांचे उल्लंघन केल्यास कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त एक लाख रुपये दंड व पाच वर्षापर्यंत कारावास व उल्लंघन पुढे चालु ठेवल्यास प्रत्येक दिवशी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

तसेच वाद्य वाजवितांना त्यावर अश्लील निबंर्धींत व आक्षेपार्ह गाणे न वाजविण्यावर विशेष भर देण्यात आला. त्याप्रमाणे शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, न्यायालय परिसरात वाद्यांचा वापर करु नये असे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*