हस्ती बँकेच्या निजामपूर शाखेचा आज वर्धापन दिन

0
दोंडाईचा । दि.28 । प्रतिनिधी-दि.हस्ती को-ऑप. बँकेच्या निजामपूर शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त ग्राहक, सभासदांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी स्नेहमिलन सोहळ्यााचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.29 रोजी निजामपूर शाखेच्या प्रांगणात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पारदर्शक व्यवहार, विनम्र व तत्पर सेवेची 46 वर्षांची परंपरा असलेल्या दि.हस्ती को-ऑप.बँकेची निजामपूर येथे दि. 29 ऑगस्ट 2016 रोजी शाखा सुरु करण्यात आली होती.
बँकेने आपल्या इतर शाखांप्रमाणेच या शाखेतूनही आरटीजीएस, एनईएमटी, एटीएम यासह सर्व सुविधा पुरवित ग्राहकांचा विश्वास संपादन केला.

तसेच केंद्र व राय सरकारच्या विविध शासकीय सबसिडी बचत खात्यात जमा करणे, मोबाईल अ‍ॅपद्वारे घरबसल्या आर्थिक व्यवहार करण्याची सेवा, ऑनलाईन शासकीय कर भरणे यासह आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा ग्राहकांना पुरविण्यात येतात.

आजमितीस बँकेच्या रायभरात 21 शाखा कार्यरत असून ग्राहक, सभासदांच्या विश्वासाच्या बळावर प्रगतीचे शिखर गाठत आहे. बँकेने सन 2016-17 या आर्थिक वर्षात 6 कोटी 61 लाख इतका निव्वळ नमा मिळविला.

तसेच बँकेचा एकुण व्यवसाय देखील 851 कोटींच्या वर पोहोचला असून सलग 5 व्या वर्षी नेट एनपीए 0 टक्के राखण्यात यश मिळविले आहे.

बँकेचे आधारस्तंभ कांतीलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, सरव्यवस्थापक माधव बोधवाणी यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी ग्राहक, सभासदांना आधुनिक व तत्पर सेवा देण्यासाठी प्रयत्नरत असतात.

बँकेचे सभासद, ग्राहकांनी उपस्थित राहावे असे आवाहन निजामपूर शाखेचे समिती चेअरमन पंडित बदामे, समिती व्हा. चेअरमन डॉ.हेमंत पाटील, सदस्य नयनकुमार शहा, प्रा.डॉ.सुधाकर जाधव, विजय रेलन, जितेंद्र जयस्वाल, दगडु पाटील, शाखा व्यवस्थापक मनोज सूर्यवंशी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*