अंधश्रध्दा निर्मृलनासाठी जनजागृती आवश्यक : ‘देशदूत’च्या चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

0

धुळे |  प्रतिनिधी : श्रध्दा असावी परंतु अंधश्रध्दा नसावी. आज आपण २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत तरी देखील अंधश्रध्दा जोपासली जात आहे. अंधश्रध्देसाठी कायदाही झाला पण अंधश्रध्दा संपलेली नाही. यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

देशदूततर्फे येथील कार्यालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी सप्तश्रृंगी महिला संस्थेच्या अध्यक्षा मिना भोसले, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, सामाजिक कार्यकर्त्या रत्ना सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, वैशाली शिरसाठ यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना मान्यवर म्हणाले की, महिलाच स्वतः पुढे आल्या तर अंधश्रध्दा आपोआप थांबेल. परंतु त्यासाठी महिलांनी संघटीत होणे गरजेचे आहे. महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रसार माध्यमांनी पुढे यावे, असेही मान्यवरांनी सांगितले.

महिलांनी स्वतः पुढे यावे – वैशाली शिरसाठ, भाजपा पदाधिकारी

श्रध्दा असावी, परंतु अंधश्रध्दा नसावी. महिलाच स्वतः पुढे आल्या तर अंधश्रध्दा आपोआप थांबेल. परंतु त्यासाठी महिलांनी संघटीत होणे गरजेचे आहे.

अंधश्रध्देपोटी महिला ढोंगी साधुंचा आधार घेतात, हे थांबविले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे परंतु २१ व्या शतकाकडे वाटचाल करतांना ते होत नसल्याचे दिसून येत आहे.

अंधश्रध्दा नसावी – मीना भोसले , अध्यक्षा, सप्तश्रृंगी महिला संस्था
श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नसावी, तरी देखील अंधश्रध्देला महिला बळी पडतात. सुशिक्षीत महिलांमध्येही अंधश्रध्देचे प्रमाण जास्त आढळून येते.
अंधश्रध्देला बळी पडून महिला उपवास धरते. परंतु जास्त उपवासामुळे तिच्या शरिरातील एचबी कमी होते. यामुळे तिची प्रकृती बिघडते. म्हणून महिलांनी अंधश्रध्देला बळी पडू नये

साक्षरतेचे प्रमाण वाढवा – ज्योती पावरा  जिल्हाध्यक्ष, महिला राष्ट्रवादी

स्त्री ही भावूक असते. तिने कुटुंबासाठी त्याग केलेला असता. कुटुंब सुव्यवस्थित रहावे म्हणून ती भावनेपोटी उपवास करते. आजही आदिवासी समाजात महिलांमध्ये जागृती झालेली नाही.

यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे. स्त्री ही शिकली तर संपूर्ण कुटुंब ती पुढे आणू शकते. यामुळे स्त्रियांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.
रुढी, परंपरा थांबवा – रत्ना सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या
नवस, मानता करणे हे रुढी परंपरेने चालत आले आहे. त्यामुळे महिला अशुध्द पाण्यातही आंघोळ करते. म्हणून तिला आजारही लागु शकतो.
हे अनुकरण थांबविले पाहिजे. महिलांमधील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. यासाठी महिलेच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे.
लहान पणापासून अंधश्रद्धा – प्रतिभा शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या

अंधश्रध्देला बळी न पडता निसर्गाने भरपूर दिले आहे. त्याप्रमाणे आहार घ्यावा. गणेशोत्सव काळात देखावा सादर करतांना प्लॅस्टिकचा वापर केला जातो. परंतु निसर्गाने सुंदर सुंदर फुले दिली आहेत.

त्याचा वापर करुन देखावे सादर करावा. महिलांवर लहान पणापासून अंधश्रध्देबाबत बिंबविले जाते. ते कुठेतरी थांबविले पाहिजे.

LEAVE A REPLY

*