गुड्ड्या हत्त्याप्रकरणातील आरोपींना ‘मोक्का’

0
धुळे । दि.27 । प्रतिनिधी-येथील कुख्यात गुंड गुड्ड्या हत्त्याप्रकरणी निष्पन्न झालेल्या 18 आरोपींना मोक्का लावण्यात आला असून विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील गोपाल टी-हाऊससमोर काही दिवसांपूर्वी गुड्ड्याची भरदिवसा हत्त्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी 18 आरोपींना शोधण्यात यश मिळविले आहे. सदर आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

त्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सर्व 18 आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव करीत आहेत.

LEAVE A REPLY

*