धनादेश अनादरप्रकरणी कर्जदारास सक्तमजुरीची शिक्षा

0
धुळे । दि.26 । प्रतिनिधी-दी शहादा पिपल्स को ऑप बँक लि.च्या कर्जदाराचा धनादेश अनादर झाल्याप्रकरणी कर्जदारास सहा महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा व तीन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी असे आदेश न्यायमूर्ती डी.आर.पठाण यांनी दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, दी शहादा पिपल्स को ऑप बँक लि.च्या धुळे शाखेकडून सौ. मिनाबाई नंदकिशोर सिंधी यांनी कर्जाऊ रक्कम घेतली. सदर कर्जाऊ रकमेच्या परतफेड पोटी त्यांनी बँकेस तीन लाखांचा धनादेश दिला होता.

परंतु सदर धनादेश न वटल्यामुळे बँकतर्फे तत्कालीन शाखाधिकारी संजय नंदलाल अग्रवाल यांनी जिल्हा बँकेत अ‍ॅड. वाय.जी.जोशी यांच्यामार्फत कर्जदार सौ. मिनाबाई यांच्या विरुध्द दावा दाखल केला.

सदर दावा न्यायमूर्ती डी.आर.पठाण यांच्यापुढे सुरु झाला. बँकेतर्फे माजी शाखाधिकारी राजेंद्र नामदेव पाटील व नितीन बाफना यांच्या साक्ष तपासण्यात आल्या साक्षपुरावा ग्राह्य धरुन सौ. मिनाबाई सिंधी यांना चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881 च्या कलम 138 अन्वय अपराधासाठी फौ.प्र.सं. 1993 चे कमल 255 (2) अन्वेय दोषी ठरवून त्यांना सहा महिन्याची सक्त मजूरी व तीन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा न्यायालयाने ठोठवली. एक महिन्याच्या आत रक्कम बँकेस सिंधी यांनी न दिल्यास जादा एक महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*