आ.गोटे यांचे बंधू व भावजयीचा अपघाती मृत्यू

0
धुळे । दि.25 । प्रतिनिधी-नागपुरवरून परभणीकडे जाणार्‍या फोर्डफिगो कारला पैनगंगा नदीवर समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यावेळी कार नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली.
या अपघातात चालकासह तिघांचा नदीपात्रात बुडून जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये धुळे शहराचे भाजपाचे आ. अनिल गोटे यांचे बंधू ज्ञानेश्वर गोटे, भावजाई रत्ना ज्ञानेश्वर गोटे यांचा समावेश आहे. हा अपघात आज दि.25 रोजी हदगाव-उमरखेड रोडवरील पैनगंगा नदीवर घडला.

ज्ञानेश्वर गोटे हे परभणी येथे भुमापन अधिकारी म्हणून कार्यरत होते. नागपुरवरून परभणीकडे जात असताना पैनगंगाच्या पुलावर कार जात असताना समोरून येणार्‍या एमएच 24 यू 8109 या क्रमांकाच्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली.

समोरून येणार्‍या ट्रक वेगात असल्याने कारला ट्रकची धडक बसून पुलावरून कोसळून नदीपात्रात जाऊन पडली. अपघातानंतर पोलिसांना माहिती कळविण्यात आली.

तेथील नागरिक व पोलिसांच्या मदतीने कारमधील लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र तत्पर्वूीच कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झालेला होता. कागदपत्रांची आधारे मयतांची ओळख पटविणे शक्य झाले.

मयतांमध्ये परभणी येथे भुमापन अधिकारी असलेले ज्ञानेश्वर उमराव गोटे त्यांची पत्नी रत्ना ज्ञानेश्वर गोटे व चालकाचा समावेश आहे. ज्ञानेश्वर गोटे यांच्या नोकरीचा कार्यकाळ आठरा महिने शिल्लक राहीला होता.

त्याना एकुलती एक मुलगी असुन ती मुबंई येथे राहते. दरम्यान कारला धडक देऊन ट्रक चालकाने पलायन केले होते. मात्र ट्रक चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान या अपघाताची माहिती आ. अनिल गोटे यांच्यासह कुटूंबाला आज दुपारी कळविण्यात आली. त्यानंतर आ. अनिल गोटे, लोकसंग्रामचे नेते तेजस गोटे हे परभणी येथे रवाना झाले असून मृतांवर उद्या दि. 26 रोजी सकाळी 8 वाजता परभणी येथे अंत्यविधी होणार आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.अनिल गोटे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला व सहवेदना व्यक्त केल्या.

 

LEAVE A REPLY

*