राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्याध्यक्षपदी यशवर्धन कदमबांडे

0
धुळे । दि.24 । प्रतिनिधी-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी यशवर्धन कदमबांडे यांची मुंबई येथे निवड करण्यात आली. गेल्या आठ महिन्यापासून हे पद रिक्त होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीचा सोहळा पार पडला.

आगामी काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, जास्तीत जास्त विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडले जावेत, यासाठी आपण प्रयत्न करु. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक लढा उभारणार असल्याचे नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष यशवर्धन कदमबांडे यांनी सांगितले.

विद्यापीठ सिनेट निवडणुकांमध्ये सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते आ.अजित पवार, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, सरचिटणीस बसवराज नगराळकर, आ.हेमंत टकले, प्रदेश युवक अध्यक्ष संग्राम कोते-पाटील, उमेश पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सचिन आखाडे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*