शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणार

0
साक्री । ता. प्र.-केंद्र शासनाने शेतकरी हिताचा विचार करून नवीन भूमी अधिग्रहण कायदा तयार केला असून जमिनीच्या बदल्यात शेतकर्‍यास अधिक आर्थिक मोबदला देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
सरकार सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानूनच विकासाची दिशा अवलंबत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.6 संघर्ष समितीच्या वतीने मंत्री डॉ भामरे यांचा बालआनंद नगरी येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉ भामरे यांचा नागरी सत्कार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, भाजपाचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील, माजी आमदार जयवंत ठाकरे, तहसीलदार संदीप भोसले, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, डॉ राहुल भामरे, संघर्ष समितीचे सुरेश सोनवणे, संजय मराठे, चंद्रकांत सोनवणे, संजू सोनवणे, डॉ. के.एस.सोनवणे आदींसह समितीचे पदाधिकारी व तालुक्यातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ भामरे पुढे म्हणाले कि, साक्री, पिंपळनेर, देवळा, चांदवड या महामार्गाचे डीपीआर तयार असून लवकरच काम सुरु होईल. तसेच तालुक्यातील पांझरा कान साखर कारखाना सुरु होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन यावेळी डॉ भामरे यांनी उपस्थितांना दिले .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष समितीचे सुरेश सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, संजय मराठे, संजू पाटील, डॉ के एस सोनवणे, भास्कर सोनवणे, कुणाल सोनवणे, संग्राम पाटील, विलास पाटील, नंदू फौजी व फागणे, भाडणे आणि नवापूर येथील सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*