‘अंकुर’च्या खान्देशस्तरीय कवी संमेलनात 160 कवींचा सहभाग

0
धुळे । दि.24 । प्रतिनिधी-अंकुर साहित्य संघ व जनसेवा फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या खान्देशस्तरीय रिमझिम कवीसंमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कवी संमेलनात 160 कवींनी सहभाग घेतला.
कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संस्कृती मंडळाचे प्रा.डॉ.किसन पाटील हे होते. संमेलनाचे उद्घाटन अहिराणी भाषा साहित्य अभ्यासक डॉ.रमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.

तर प्रमुख पाहूणे म्हणून सुभाष अहिरे, डॉ.फुला बागूल, डॉ.दरबारसिंग गिरासे, निंबाजीराव बागूल, प्राचार्य अशोक शिंदे, जगदीश देवपूरकर, सुनंदा निकम, रविराज भामरे, महेश नेरकर, सौ.सारिका रंधे, वैशाली शिरसाठ आदी उपस्थित होते.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ.किसन पाटील यांनी मनोगतात कविता बोले कशी व जगवते कशी यावर प्रकाश टाकत नवकविंना संदेश दिला. मी आयुष्यभर साहित्य शिकवले, भाषा शिकवली नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी डॉ.फुला बागूल, निंबाजीराव बागूल, अशोक शिंदे, सारिका रंधे यांनीही मनोगत व्यक्त करुन कविता सादर केल्या.

खान्देशस्तरीय कवीसंमेलनात 160 कवींनी सहभाग घेतला. तर 115 कवींनी आपल्या कविता सादर करीत रिमझिम कवीसंमेलनात रसिकांना ओलेचिंब भिजवले.

खान्देशनी वानगीचे संपादक कवी रमेश बोरसे व प्रा.रमेश राठोड यांनी बुकस्टॉलची मांडणी यावेळी करुन साहित्यिकांसाठी अहिराणी साहित्य उपलब्ध करुन दिले. कवीसंमेलनाचे प्रास्ताविक सौ.मिना भोसले यांनी केले. तर सूत्रसंचालन राजू हाके यांनी केले. आभार प्रा.सदाशिव सूर्यवंशी यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंकुर साहित्य संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रा.सदाशिव सूर्यवंशी, जनसेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.मिना भोसले, प्रा.रमेश राठोड, रमेश बोरसे, गोकुळ पाटील, डॉ.सुजाता आढे, भरत सैंदाणे, प्रा.भैय्या पाटील, गणेश पाटील, प्रविण पवार, हिरालाल भोसले, प्राचार्या रत्ना पाटील, ज्ञानेश्वर भामरे, शरद धनगर, सुरेश मोरे, भगवान अहिरे, कमलेश शिंदे, लतिका चौधरी, सुनील गायकवाड, अरविंद भामरे, मंगला रोकडे, राजीव हाके, नानाभाऊ पाटील, सौ.अरुणा देशमुख, रवींद्र वाणी, सुनील पाटील, झेड.के.पवार, सुनीता पाटील, राजेंद्र जाधव, सोपान चौधरी, प्रा.एच.आरबडगुजर, चंद्रसिंग पानपाटील, श्रावण वाणी, आप्पा खताळ, भगवान जगताप, भटू गिरमकर, दत्तात्रय कल्याणकर, चेतन पाटील, चेतना चौधरी, गुलाब मोरे, चंद्रशेखर, कासार, आण्णा कणसे, शोभा जाधव, रत्ना पाटील, डॉ.ज्योती महाजन, डॉ.पूजा भामरे, प्रदीप शिरसाठ, प्रतिमा मोरे, दीपा वानखेडे, योगिता पाटील, मिनल पाटील, रजनी ठाकूर, मंगला राजपूत, आ.न.पाटकरी, नामदेव माळी आदींनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*