शिवसेनेचा जिल्हा उपनिबंधकांना घेराव

0
धुळे । दि.23 । प्रतिनिधी-कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकर्‍यांची नावासह यादी मिळावी म्हणून राज्य सरकारच्या विरोधात तिव्र घोषणाबाजी करून जिल्हा उपनिबंधक यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.
तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सि.ई.ओ हे हजर नसल्याने त्यांच्या खुर्चिला निवेदन देऊन सि.इ.ओंच्या दालनात ठिय्या आंदोलन करून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
लिड बँकेच्या व्यवस्थापकांना घेराव घालण्यासाठी गेले असता तेथेही लिड बँकेचे व्यवस्थापक हजर नव्हते म्हणून खुर्चिला निवेदन चिटकवण्यात आले.

या तिघेही कार्यालयाच्या ठिकाणी शेतकरी बांधवांची हेळसांड करणार्‍या सरकारचा धिक्कार करण्यात आला. जिल्ह्यातील कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकर्‍यांची यादी मिळालीच पाहिजे, अशा सरकार विरोधी घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

शेतकरी बांधवांना ऑनलाईने, संगणकाचे ज्ञान नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होतांना दिसत आहेत. प्रत्येक ई सेवा केंद्रांवर 100-200 रूपये दिल्याशिवाय फार्म भरून घेतले जात नाही, पैसे देण्याची तयारी असल्यावर देखील दिवसभर उभे राहून फार्म भरून घेतले जात नाहीत.

कधी सर्वर डाऊन होते तर कधी चालू होते याची गॅरंटी नाही, कधी कधी दिवसभर सर्वर डाऊन असते. यामुळे शेतकरी बांधवांना दुसर्‍या तिसर्‍या दिवशी येऊन देखील आपले काम करून घ्यावे लागते. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसते त्यांचा हाताचा अंगठा थंम्ब होत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज

माफीचा 56 कॉलम असलेला फार्म विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून ऑनलाईन भरावा म्हणजेच शेतकर्‍याचे भरलेला फार्म व जिल्हा बँकेने भरलेला फार्म हे दोघेही फार्म राज्य सरकार तपासत नाहीत तो पर्यंत शेतकरी लाभार्थी होऊ शकत नाही.

त्याच्यात त्रुट्या आढळल्या की त्याच्यात पुन्हा समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. शेतकरी बांधवांचे कर्ज माफीचे ऑनलाईन फार्म भरून घेण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सहकार्य करीत होते.

परंतू दिवसभर सर्वर डाऊनचा मोठ्या प्रमाणावर अडसर निर्माण झाला. प्रशासनाने सी.एस.सी आणि संग्राम हे केंद्र चालू केले असतांना देखील कोणाकडे कोड नंबर नाही तर कोणाला थम मशिन नाही अशा प्रकारे सी.एस.सी आणि संग्राम केंद्र निरोपयोगी ठरले आहेत.

म्हणून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत आहे शिवसेनेने 550 शेतकरी बांधवांचे फार्म रजिस्ट्रेशन करून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी भरून घेतले.

तसेच सर्वर डाऊनमुळे 1000 च्या वर फार्म शिवसेनेच्या पदाधिकारी ई सेवा केंद्राच्या चालकांजवळ ऑफ लाईन भरून दिले.

शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळूंखे यांच्या नेतृत्वाखाली झाले. याप्रसंगी शिव आरोग्य सेनेच्या डॉ.माधुरी बोरसे, लोकसभा संघटक महेश मिस्तरी, उपजिल्हाप्रमुख संजय गुजराथी, विरोधी पक्षनेता गंगाधर माळी, तालूकाप्रमुख भरतसिंग राजपूत, न्यूरोफिजिशियन डॉ.सुशिल महाजन, युवासेना युवाजिल्हाधिकारी पंकज गोरे, उपमहानगर प्रमुख किरण जोंधळे, शेखर वाघ, माजी जि.प.सदस्य वामन पाटील उप तालूका प्रमुख सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर वाघ, विलास चौधरी, मंगलसिंग गिरासे, विभागप्रमुख प्रफुल्ल पाटील, दिनेश पाटील, रामदास कानकाटे,ललित माळी, महाविर जैन, पप्पु मराठे, विजय चौधरी, दिपक माळी, भूषण माळी, दादाभाऊ माळी, हरीश्चंद्र माळी, आनंदा पारखे, भगवान भदाणे, पिंटू सरग, डिगंबर जाधव, नितीन जगताप आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

*