धुळ्यात खड्ड्यांसाठी भाजपा नगरसेविकेचे आंदोलन

0
धुळे |  प्रतिनिधी :  गणपती मंदीर रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. तक्रार करुनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही. म्हणून आज भाजपाच्या नगरसेविकेने नागरिकांसह खड्ड्यात रांगोळी काढून निदर्शने केली.

शहरातील गणपती मंदीर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होतात. परंतू खड्ड्यांची दुरुस्ती होत नाही याबाबत महापालिकेकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्यात परंतू त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही.

म्हणून  खड्ड्याभोवती रांगोळी काढून तसेच खड्ड्यात बसून गांधीगिरी करीत मनपा प्रशासनाचा निषेध केला. नागरिकांसह हे आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

*