जिल्ह्यात पोळा सण उत्साहात साजरा

0
धुळे । दि.21 । प्रतिनिधी-पोळ्याच्या पूर्वसंध्येला वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे आज शहरासह जिल्ह्यात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्जाराजाची सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात येवून गावदरवाजा जवळ पोळा फोडण्यात आला.
पाऊस नसल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये निरुत्साह होता. वरुणराजाने बरसावे म्हणून देवाला साकडेही टाकण्यात आले होते.

तब्बल दीड महिना पावसाने हजेरी लावली नाही. पिके करपण्यास सुरुवात झाली होती, परंतु काल वरुणराजाने जिल्ह्यात हजेरी लावली.

यामुळे शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या. त्यांनी पोळा सण उत्साहात साजरा करण्यासाठी काल व आज खरेदी केली. पारंपारिक पध्दतीने सर्जाराजाला सजविण्यात आले.

सर्जाराजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावदरवाजा जवळ पोळा फोडण्यात आला.

यापुढे तरी वरुणराजाने शेतकर्‍यांना तारावे म्हणून शेतकर्‍यांनी आज देवापुढे साकडे टाकले. चांगले पिकू दे, अशीही प्रार्थना केली.

 

LEAVE A REPLY

*