ग्राहक हिताचे फलक ग्रामपंचायतींमध्ये लावा !

0
सोनगीर । दि.19 । वार्ताहर-मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे येत्या चार-पाच महिन्यांत उद्घाटन होईल. या मार्गावरील सोनगीरला रेल्वे स्थानक बनविण्यात येईल.
तसेच दिल्ली – मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरमुळे इंडस्ट्रीयल झोन हा सोनगीर ते नरडाणा दरम्यान असेल. तापी-जामफळ-कनोली प्रकल्पासाठी 2360 कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी सांगीतले.

आजपासून (दि.19) दोन दिवसीय ग्राहक पंचायतीचे राज्यव्यापी मेळाव्याचे उद्घाटन डॉ.भामरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी ग्राहक हिताचे फलक ग्रामपंचायतीमध्ये लावावेत, अशी सुचनाही डॉ. भामरे यांनी यावेळी केली.

अध्यक्षस्थानी राज्य ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ. विजय लाड होते.प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे अरविंद जाधव, राज्य संघटक सर्जेराव जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष मार्तंडराव जोशी, विभागीय संघटक अरुण भार्गवे, सहसंघटक डॉ.योगेश सुर्यवंशी, माजी महापौर मंजुळा गावित, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, उपसरपंच धनंजय कासार, राज्य सचिव अर्जुन वाघमारे, वसंत देशमुख, राज्य सहसंघटक मेघाताई कुलकर्णी. प्रकाश पाठक, अनिल जोशी, पवन अग्रवाल, डॉ.विजय लाड, सुरेश वाघ, प्रा.डॉ.देसले, सर्जेराव जाधव, अजय भोसरेकर उपस्थित होते. येथील आनंदवन संस्थानच्या सभागृहात मेळावा सुरू आहे.

मेळाव्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. भामरे यांच्याहस्ते ग्राहक पंचायतीचे मानचिन्हाचे तसेच ग्राहक पंचायतीचे मुखपत्र ग्राहकतीर्थ च्या प्रथम अंकाचे प्रकाशन झाले.

डॉ.भामरे म्हणाले की ग्राहकांत जागृती नसल्याने व ते संघटीत नसल्याने त्यांची लुबाडणूक होते. अशा ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य ग्राहक पंचायत करीत आहे.

ग्राहकांचे आठ अधिकार लिहिलेला फलक गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयात लावावा. ग्राहकांनी सतत जागरूक राहून फसवणूकीला बळी पडू नये.

अशा सुचना देऊन डॉ.भामरे यांनी केली. ते म्हणाले सोनगीरला कब्रस्थान ट्रस्टचे आवाराची भिंत व गावातील रस्तेसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये दिले.

पुढेही विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. लवकरच सोनगीरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी गावोगावी ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. रवींद्र महाजनी यांनीही विचार मांडले.

प्रास्ताविक नाशिक विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे यांनी केले. सुत्रसंचलन शेखर देशमुख, आरीमखाँ पठाण यांनी केले. डॉ. अजय सोनवणे यांनी आभार मानले.

धुळे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष अ‍ॅड.जे.टी. देसले, रतनचंद शहा, रवींद्र महाजनी, डॉ.अजय सोनवणे, धुळे तालुका अध्यक्ष एम.टी. गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्राहक पंचायतीचे डॉ.कल्पक देशमुख, शेखर देशमुख, एल. बी.चौधरी, किशोर पावनकर, राजूबाबा पाडवी, शरद पाचपुते, शिवनाथ कासार, ज्ञानेश्वर चौधरी, नंदकिशोर कोठावदे, के. के. परदेशी, मनोज जैन, प्रसाद जैन, राहुल देशमुख, दीपक पाटील, कल्पेश पाटील, विशाल कासार आदी कार्यकर्ते संयोजन करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*