पिंपळनेर येथे दोन घरफोड्या

0
पिंपळनेर । वार्ताहर-पिंपळनेर येथे एकाच रात्री दोन घरफोड्या होवून लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपळनेर येथील सामोडे रोडवरील कन्हैयालाल नगरात राहणारे मनोज पुंडलिक घरटे हे त्यांच्या कुटुंबियांसह नाशिक येथे गेले होते.
त्या दरम्यान चोरट्यांनी घरटे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे तोडून सात तोळे वजनाचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले.

त्यात 25 ग्रॅम वजनाची सोनपोत, 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सात ग्रॅम वजनाच्या अंगठ्या, सहा ग्रॅम वजनाचे कानातील दागिने, पाच ग्रॅम वजनाच्या रिंगा, दोन ग्रॅम वजनाचे दोन पेंडल, तीन ग्रॅम वजनाची नथ यांचा समावेश आहे.

घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला. श्वानपथकाला बोलाविण्यात आले. श्वानने काही अंतरापर्यंत माग काढला.
घरटे यांच्या घराच्या पुढे काही अंतरावर किसन गंगाराम राऊत यांच्या मालकीचे गजानन मेडिकल आहे.

चोरट्यांनी सदर मेडिकल लक्ष्य केले. दुकानाच्या दरवाजाचे कुलूप करवतीने कापून दुकानातील गल्ल्यातून सहा हजार रुपये रोख चोरुन नेले.

याबाबत मनोज पुंडलिक घरटे यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*